VIDEO : मला कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन, अब्दुल सत्तारांनी ग्रामसेवकाला झापलं!

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला.

VIDEO : मला कॉपी पाठवा बस्स, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन, अब्दुल सत्तारांनी ग्रामसेवकाला झापलं!
Abdul Sattar
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 8:50 AM

औरंगाबाद : जनतेच्या कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भिडणाऱ्या नेत्यांमध्ये काही नावं अग्रेसर आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar).  औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला.

अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला दम भरल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले? 

हॅलो,

तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र का दिले नाही?

ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ

नाही केलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर असं चालेल का काहीतरी

तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. मृत्यू-जन्म सर्टिफिकेट हे देणं हे आपलं कर्तव्य आहे.

तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आहे, असं नाही चालणार

मला कॉपी पाठवा बस्स, मला बाकी काही सांगू नका. तात्काळ कॉपी पाठवा. (फोन ठेवला)

त्यानंतर अब्दुल सत्तार उपस्थितांना म्हणतात, काय काम करतात हे, मृत्यू प्रमाणपत्र देत नाही म्हणजे किती बोगस लोक आहेत, राजकारण कुठे करावं याची पण एक सीमा असते.

VIDEO : मंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामसेवकाला झापलं

सत्तारांच्या गळ्यात पडून शेतकरी हमसून हमसून रडला

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून शेतकरी हमसून हमसून रडल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शिवना नदीच्या काठावरील गावात अब्दुल सत्तार पाहणी करत असताना हा प्रकार घडला आहे. शिवना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे दुःख सहन न झालेल्या शेतकऱ्यांनी पाहणीसाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला सुरुवात केली. तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. शेतकऱ्यांचा रडतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुरामुळे शेतीचे किती अतोनात नुकसान झालंय याचा अंदाज येतोय

अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची पाहणी

दरम्यान, 07 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद (Heavy Rainfall in Aurangabad) शहरातील अनेक भागात पाणी शिरले. या दिवशी एवढा विक्रमी पाऊस पडला की खाम नदी तुंबून तिचे पाणी सखल भागात शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. येथील नुकसानीची पाहणी आज राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार (state revenue minister Abdul Sattar) यांनी केली. खाम नदीवरील सध्याचा पूल पाडून नवीन उंच पूल बांधण्याकरिता तसेच नदीपात्र आणखी खोल करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी पंधरा दिवसात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

नवीन पूल बांधण्याचा प्लॅन तयार करण्याच्या सूचना

खाम नदीवरील नवीन पूल बांधण्याचे आणि नदी खोल करणे संबंधीचा प्लॅन तात्काळ तयार करून देण्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी नूर कॉलनीसाठी जेवढा शक्य होईल तो निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे, माजी नगरसेवक रेणूकदास वैद्य, माजी नगरसेविका शिल्पा वाडकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, वॉर्ड अधिकारी एस डी जरारे, वॉर्ड अभियंता डी के परदेशी व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या 

राधाकृष्ण विखे-पाटील आणि अब्दुल सत्तार एकाच मंचावर, भाषणात जुन्या आठवणींना उजाळा

Abdul Sattar Breaking | नाराज सेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली

VIDEO | पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी मंच सोडला

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.