पप्पा, तोपर्यंत माघार घेऊ नका… डोळ्यात अश्रू अन् लेकीचा बापाला आग्रह; जरांगे यांची कन्या आणखी काय म्हणाली?

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीही खालावली आहे.

पप्पा, तोपर्यंत माघार घेऊ नका... डोळ्यात अश्रू अन् लेकीचा बापाला आग्रह; जरांगे यांची कन्या आणखी काय म्हणाली?
manoj jarangeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 1:15 PM

जालना | 6 सप्टेंबर 2023 : गेल्या नऊ दिवसांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर, गेल्या पाच दिवसांपासून मराठा आंदोलकांची राज्यभरात निदर्शने सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर काहीही तोडगा निघालेला नाही. जरांगे पाटील यांची तर उपोषणामुळे प्रकृती बिघडली आहे. त्यांना उपोषण स्थळीच सलाईन लावण्यात आली आहे. जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. तर, जरांगे पाटील यांच्या या निर्धाराला त्यांच्या कन्येनेही बळ देण्याचं काम केलं आहे.

पप्पा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने केलं आहे. माझे पप्पा हट्टी आहेत, ते असे उठणार नाहीत. पप्पांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल. मला पण भविष्यात आयपीएस व्हायचं आहे, असं जरागें पाटील यांची मुलगी म्हणाली.

डोळ्यात अश्रू

लाठीचार्ज झाला त्यात पोलिसांचा दोष नाही. वरून ऑर्डर आल्यामुळे लाठीचार्ज केला असणार. पप्पांच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल. पप्पांची काळजी वाटते मात्र समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण आरक्षण मिळाल्याशिवाय त्यांनी उपोषण सोडू नये, असं सांगतानाच जरांगे पाटील यांच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू आले. मनोज जरंगे यांच्या पत्नीनेही त्यांच्या जीवाची काळजी आहे. मात्र सरकारने लवकर प्रश्न सोडवावा, असं म्हटलंय.

निर्भयाच्या समाधीसमोर उपोषण करणार

दरम्यान, नगरच्या कोपर्डी येथील पीडितांच्या कुटुंबीयांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे, चार दिवसात मराठवाड्यासह संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास कोपर्डी येथे निर्भयाच्या समाधी समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच पीडितांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

7 वर्षानंतर सुद्धा माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही. आम्हाला कुठली माहिती दिली नाही. जिल्हा कोर्टात निकाल लागल्या नंतर सध्या केस संदर्भात आम्हाला कुठलीच माहिती नाही, असंही त्यांनी सांगितलं. कोपर्डीत पीडित कुटुंब आज दिवसभर आत्मकेश आंदोलन करणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.