औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा पालिका प्रशासकांच्या घरासमोर कचरा टाकू, एमआयएमचा अल्टिमेटम
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएम आक्रमक झाली आहे. शहरात सर्वत्र कचरा साचला असून त्याची त्वरीत विल्हेवाट लावण्याची मागणी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएम आक्रमक झाली आहे. शहरात सर्वत्र कचरा साचला असून त्याची त्वरीत विल्हेवाट लावण्याची मागणी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच 24 तासांच्या आत कचऱ्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही पालिका प्रशासकांच्या शासकीय निवासस्थानासमोर कचरा आणून टाकू असा अल्टिमेटमदेखील एमआयएमने औरंगाबाद प्रशासनाला दिला. (MIM demand garbage immediate disposal warns to throw garbage in front of municipal administrator house)
कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएमचा आक्रमक पवित्रा
मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी कचरा साचत असल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. याच कारणामुळे कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएमने आक्रमक पवित्रा धारण केलाय. एमआयएमने शहरातील कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केलीय. तसेच येत्या 24 तासांच्या आत पालिका प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा पालिका प्रशासकांच्या घरापुढे आम्ही कचरा आणून टाकू असा इशारासुद्धा एमआयएमने दिला आहे. म्हणजेच एमआयएमने पालिका प्रशासनाला 24 तासांचे अल्टिमेटम दिले आहे.
खासगी कंपनी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांत संगनमत
सोबतच कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करत एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. खासगी कंपनी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात संगनमत आहे. याच कारणामुळे कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही असा गंभीर आरोपही एमआयएमने केला आहे. सोबतच शहरातील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची दुरावस्था दाखवली आहे. एमआयएमच्या या गंभीर आरोपानंतर तसेच दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता पालिका प्रशासन काय पवित्रा घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कव्वालीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण
दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात औरंगाबाद प्रशासनाच्या निर्णयाला जोरदार विरोध करणारे AIMIMचे खासदार इम्तियाज जलील काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले होते. कोरोना काळात त्यांनी 6 जुलै रोजी थेट शासनाच्या नियमावलीलाच हरताळ फासला होता. खुलताबाद परिसरातील एका कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. इतकंच नाही तर जलील यांच्यावर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पैशांची उधळणही झाली होती. या प्रकारानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी जलील यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
इतर बातम्या :
औरंगाबादेत एकाच दिवशी दोन मृत्यू ! एकाचा ट्रेकिंगदरम्यान तर दुसरऱ्याचा डोहात बुडून शेवट
Video | बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा औरंगाबादेत अपघात, लुटीसाठी लोकांची गर्दी
VIDEO | औरंगाबादेत मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, लहान मुलाच्या पायाचा लचका तोडला
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील शौचालये अखेर 7 दिवासानंतर खुली https://t.co/tGGY5uHKvC @Navimumpolice @mieknathshinde @OfficeofUT #NaviMumbai #APMCMarket #ToiletsOpen #APMC
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021
(MIM demand garbage immediate disposal warns to throw garbage in front of municipal administrator house)