Abdul Sattar: आयुष्यात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी चार दिवसात मिळाला; अब्दुल सत्तारांकडून शिंदे सरकारचे गुणगान
औरंगाबाद : ज्या कारणामुळे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे (Rebel MLA Group) गट बाहेर पडल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर बंडखोर शिंदे गटाच्या प्रत्येक हालचालीवर आणि त्यांच्या भूमिकेवर अनेकांनी लक्ष ठेवले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर बंडखोरीवर जाहीररित्या बोललंही जाऊ लागलं. बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र […]
औरंगाबाद : ज्या कारणामुळे शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे (Rebel MLA Group) गट बाहेर पडल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर बंडखोर शिंदे गटाच्या प्रत्येक हालचालीवर आणि त्यांच्या भूमिकेवर अनेकांनी लक्ष ठेवले होते. त्यानंतर काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर बंडखोरीवर जाहीररित्या बोललंही जाऊ लागलं. बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विकास कामांना गती येणार असल्याचे मत शिंदे गटातील आमदार बोलू लागले आहेत. त्यामुळे आता बंडखोरी नाट्यानंतर अब्दुल सत्तार (MLA Abdul Sattar) आपल्या सिल्लोड मतदार संघात (Sillod constituency) जाण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले.
सर्व कामं मार्गी लावली
त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी अजून मतदारसंघात गेलो नाही, पण जिल्ह्यात आलो आहे. विशेष म्हणजे काही अनेक वर्षांची कामे राहिली होती. ती सर्व मुख्यमंत्र्यांकडे दीड-दोन वर्षांपासून खोळंबली होती, ती सर्व मार्गी लावून आलो. आता मतदार संघात जात आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही, तेवढा या चार दिवसांत मिळाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही
यावेळी त्यांनी मंत्रिपदाबाबत बोलताना सांगितले की, खरं म्हणजे मला कॅबिनेटसुद्धा नाही आणि राज्यमंत्रीपदसुद्धा नाही. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येतात, किती खाती येतात, त्याप्रमाणे पुढील रुपरेषा आणि दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही. माझ्याकडे सध्या खूप मोठे पद आहे, ते म्हणजे एका कार्यकर्त्याचे पद आहे असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
संजय राऊतांनी आईची शपथ घ्यावी
तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. शिवसेनेत बंड पुकारलेल्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, संजय राऊत यांनी आईची शपथ घेऊन सांगावे की खासदार होण्यासाठी किती कोटी दिले, असा थेट सवाल अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांना केला आहे. त्यामुळे हे राजकारण पुन्हा तापणार असल्याचेच दिसत आहे.
राऊत विरोध शिंदे बंडखोर गट
बंडखोरी केलेल्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल संजय राऊत करत आहेत. आज त्यांनी 50 खोक्यांवरून टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे आता संजय राऊत विरोध शिंदे बंडखोर गट एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.