Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय शिरसाट यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांना राजकारणाचे टोमणे आणि सल्ले

शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना अंबादास दानवेंच्या राजकारणाचीही आठवण करुन दिली आहे. त्यामुळे या वादाला आता नव्याने तोंड फुटण्याच शक्यता आहे.

संजय शिरसाट यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांना राजकारणाचे टोमणे आणि सल्ले
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 8:10 PM

औरंगाबादः शिवसेनेतून बंडखोरी (Rebellion) करुन महाविकास आघाडीची सत्ता घालवणाऱ्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील वाद गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहचले आहेत. शिवसेनेतून ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav THackeray) गटाला लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आज झालेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबादेत शिंदे गटातील नेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी बोलताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका करत असताना त्यांची जीभ घसरली.

चंद्रकांत खैरे यांच्याव टीका करताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर जसा निशाणा साधला तसाच निशाणा त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर साधला. आणि शिवसेनेतील जुन्या वादाला पुन्हा एकदा पेटवण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना ज्यानी पाडलं, ते त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन पुढे कसा निघून गेले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी ते म्हणाले चंद्रकांत खैरे यांना शप्पथ घेऊन सांगावे की, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत कुणी पाडलं. असा सवाल करुन त्यांनी अंबादास दानवेंच्याकडे रोख ठेवला. संजय शिरसाठ यांनी शिवसेनेतील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यार टीका करत असताना त्यांनी जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे.

चंद्रकांत खैरे यांना राजकारण कळत नाही. त्यामुळे त्यांनी एकदा कुठेही देवाची शपथ घेऊन सांगावे की, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत कोणी पाडले आहे. संजय शिरसाठ यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दानवे-खैर वाद पेटणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करुन वेगळी चूल मांडणाऱ्या संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना त्यांना राजकारणच कळत नाही.

म्हणून त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन तो कसा पुढे गेला असा असं म्हणत त्यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या जुना वादाच्या आठवणीना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला. त्यामुळे शिससाठ-खैरे आणि दानवे वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.