मराठा क्रांती मोर्चा गाडी रोखणार, एमआयएमचे ‘धन्यवाद’ म्हणत आंदोलन, ठाकरेंचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर उपहासात्मक आंदोलन करणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चा गाडी रोखणार, एमआयएमचे 'धन्यवाद' म्हणत आंदोलन, ठाकरेंचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?
mp imtiyaz zaleeel
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 6:31 PM

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) येत्या 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र या दौऱ्यादरम्यान औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. जलील यांच्या नेतृत्वात एमएयएमचे कार्यकर्ते विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवादाचे फलक घेऊन आंदोलन करणार आहेत. जलील यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. (mp imtiaz jaleel will protest against uddhav thackeray on 17 september for aurangabad city development issues)

एमआयएमतर्फे उपरोधिक आंदोलन केले जाणार 

येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याची परवानगी जलील प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यामुळे ती नाकारण्यात आली. त्यानंतर जलील यांनी ठाकरे यांच्याविरोधात उपरोधिक आंदोलन करण्याची शक्कल लढवली. त्यानुसार जलील यांनी शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद अशा आशयाचे फलक लावून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या उपरोधिक आंदोलनासाठी एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित असतील असे जलील यांनी सांगितले आहे.

विमानतळ ते कार्यक्रमस्थळापर्यंत धन्यवादचे फलक

मुख्यमंत्री ज्या विमातळावर उतरणार आहेत, त्या विमानतळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमतर्फे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते ठाकरे यांच्याविरोधात धन्यवादचे उपरोधिक बॅनर घेऊन उभे राहणार आहेत. तसेच शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवाद असे म्हणत एमआयएमतर्फे ठाकरे तथा राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली जाण्याचीही शक्यता आहे.

मराठा क्रांती मोर्चा ठाकरेंची गाडी रोखणार

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झाले आहेत. येत्या 17 सप्टेंबर रोजी मुख्यंत्र्यांची गाडी रोखू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच ठाकरेंची गाडी रोखून आरक्षणाशी संबंधित जे जीआर असतील त्यांची होळी करण्यात येईल अशी माहितीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता ?

एकीकडे शहर विकासाच्या मुद्द्यावरुन एमआयएम आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चानेदेखील ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. या सर्व घडामोडी ठाकरे येत्या 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना घडणार आहेत. त्यामुळे ठाकरे यांचा दौरा चांगलाच वादळी आणि चर्चेत राहणारा ठरणार आहे, असा कयास बांधला जातोय.

इतर बातम्या :

माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

अतुल भातखळकरांचं डोकं ठिकाणावर नाही, मनिषा कांयदेंचा पलटवार

मनसेच्या टार्गेटवर पुन्हा परप्रांतीय? महिला अत्याचार करणाऱ्यांमध्ये 80 टक्के परप्रांतीय, गृहमंत्र्यांना निवेदन

(mp imtiaz jaleel will protest against uddhav thackeray on 17 september for aurangabad city development issues)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.