Aurangabad | पाइपने गॅस नको, आधी पुरेसं पाणी द्या, खा. जलील यांचा आक्रमक पवित्रा, केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार

औरंगाबाद शहराच्या महसुलावर बोजा उत्पन्न करणाऱ्या योजनेच्या निषेधार्थ, गोरगरीब जनतेला घर मिळणार अशा खोट्या आश्वासनाच्या विरोधात एयआएम आंदोलन करणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

Aurangabad | पाइपने गॅस नको, आधी पुरेसं पाणी द्या, खा. जलील यांचा आक्रमक पवित्रा, केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार
खासदार इम्तियाज जलील यांचा पत्रकार परिषदेत इशाराImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 9:28 AM

औरंगाबादः शहरातील नागरिकांना पाइनपाइलने गॅस (Aurangabad Gas pipeline) पुरवणारी पीएनजी योजना राबवण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ येत्या 2 मार्च रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी नुकतीच याविषयीची घोषणा केली होती. तसेच या कामाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित राहणार आहेत, असेही नियोजन आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते. सातारा-देवळाईसह बहुतांश भागात अद्याप नळ योजना नाही, संपूर्ण शहराला आधी वेळेवर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी द्या, मगच पाइपलाइनने गॅस देण्याचा विचार करा, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे. तसेच 2मार्च रोजी गॅस पाइपलाइनच्या उद्घाटनासाठी येणारे भाजपचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना काळे झेंडे दाखवून निरोध करणार असल्याचे ते म्हणाले.

गॅस पाइपलाइनविषयी काय म्हणाले खासदार?

औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील अनेक योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ‘ गॅस पाईप लाईनमुळे शहरातील सर्व रस्ते खोदल्या जाणार आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था होईल आणि नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. लोकांच्या या फसवणुकी विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. गॅस पाईप लाईनमुळे अनेकांना मोठा फायदा होणार आहेत. राजकारणी लोकांच्या जवळ असलेल्या लोकांसाठी मोठा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी ही योजना बनवण्यात आली आहे. यामुळेच काही लोकांच्या फायद्यासाठी ही योजना शहरातील लोकाच्या माथी मारवली जात आहे. या योजनेचा शहराला कोणताही फायदा नसून फक्त राजकारणी लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी ही योजना बनवण्यात आल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

‘मेट्रो रेल्वेही राजकारण्यांच्या फायद्यासाठी’

खासदार जलील म्हणाले, ‘ गॅस पाइपलाइनप्रमाणेच मेट्रो डीपीआर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा शहराला कोणताही फायदा होणार नाहीत. मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार कोणताही निधी देत नाही. सर्व मेट्रोचा आर्थिक भार हा महानगर पालिकेवर असतो. यामुळे आधीच औरंगाबाद मनपा तोट्यात असताना या प्रकल्पाची शहराला काय गरज आहे. यामुळे मनपाची सर्व आर्थिक स्थिती बिघडणार आहे. नागपूर मेट्रोचा शहराला कोणताही फायदा झाला नाही. परंतु नितीन गडकरी यांच्या नावासाठी हा प्रकल्प यशस्वी म्हणून दाखवण्यात येत आह. अशीच अवस्था हैदराबाद मेट्रोची ही आहे. त्यामुळे शहरात गॅस पाईप लाईन आणि मेट्रो सारखे निरर्थक खर्च करणारे प्रकल्प शहराला नको आहे. त्या यावेजी पिण्याच्या पाण्याचा आणि गरजू लोकांना घराची जास्त आवश्यकता आहे, असे खासदार जलील म्हणाले.

‘2 मार्च रोजी निषेध व्यक्त कऱणार’

औरंगाबाद शहराच्या महसुलावर बोजा उत्पन्न करणाऱ्या योजनेच्या निषेधार्थ, गोरगरीब जनतेला घर मिळणार अशा खोट्या आश्वासनाच्या विरोधात एयआएम आंदोलन करणार आहे. तसेच घरकुल योजनेच्या भोंगळ कारभार विरोधात 2 मार्च रोजी केंद्रीय मंत्री हरदिप सिंह पूरी यांचा निषेध म्हणून काळे झंडे दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

इतर बातम्या-

वीजबिल भरावेच लागणार; …तर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, ऊर्जामंत्र्यांचा इशारा

CCTV | कारचालकाची अक्षम्य हलगर्जी, खेळणारा दोन वर्षांचा चिमुरडा गाडीखाली आला, आणि…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.