महावितरणाच्या कारभाराला वैतागून रायपूरमध्ये डिपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन; अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा

महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळेच आणि त्यांच्या कारभाराला वैतागून रायपूरच्या महिला सरपंच यांचे पती गणेश देशमुख यांनी डिपीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले.

महावितरणाच्या कारभाराला वैतागून रायपूरमध्ये डिपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन; अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा
औरंगाबाद जिल्ह्यातील रायपूरमध्ये महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शोले स्टाईलनं आंदोलनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 4:14 PM

औरंगाबादः महावितरणाच्या दुर्लक्षामुळे गंगापूर तालुक्यातील रायपूरमध्ये महावितरणच्या (MSEDCL) वीज वितरणाचे तीन-तेरा उडाले आहेत. परिसरात वीज (Electricity) वितरण वेळेत आणि योग्य होत नसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळेच आणि त्यांच्या कारभाराला वैतागून रायपूरच्या महिला सरपंच यांचे पती गणेश देशमुख यांनी डिपीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन (Sholy Style agitation ) सुरू केले. या आंदोलनानंतर महावितरणाचे कर्मचारी घटनास्थली दाखल झाले मात्र त्यांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल विचारपूस करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर आणि तेथील नागरिकांवर अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नागरिकांवर अरेरावीची भाषा

रायपूरच्या महिला सरपंच यांचे पती गणेश देशमुख यांनी महावितरणाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी डीपीवर चढून आंदोलन केले. त्यानंतर महावितरणचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र यावेळी आंदोलन मागे घ्या सांगण्याऐवजी त्यांच्याकडून आंदोलन करणाऱ्यांवर आणि नागरिकांवर अरेरावीची भाषा करण्यात येत होती. महावितरणाच्या कारभारामुळे ग्रामस्थांना वीज पुरवठा योग्य रित्या होत नाही. वीज वितरण करण्यात येत असले तरी नेहमी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो, याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रारही करण्यात आली, निवेदने देण्यात आली तरी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे महिला सरपंचाचे पती गणेश देशमुख यांनी डीपीवर चढून आंदोलन केले.

महावितरणुळे ग्रामस्थांना फटका

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. महावितरणकडून कधीही वेळेवर वीज नसते, दिवसातून अनेकदा वेळा वीज प्रवाह खंडित केलेला असतो, त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे गणेश देशमुख यांनी डीपी चढून आंदोलन केले. त्यांनी डीपीवर चढून आंदोलन केल्यानंतर महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, यावेळी त्यांनी त्यांची समजूत काढण्याऐवजी आंदोलकर्त्यांवर अरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली. यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली.

संबंधित बातम्या

Kirit Somaiya : राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून पक्षाला ‘सेव्ह विक्रांत’चा निधी दिला; वकिलाची कोर्टात धक्कादायक माहिती

Pune : ‘…तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही’, जुन्नर प्राथमिक शिक्षक संघानं काय म्हटलं? वाचा…

Nanded | ….तर आमदारकी सोडेन! आमदार Prashant Bamb यांचं बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना ओपन चॅलेंज!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.