औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेकडून केला जात आहे.
औरंगाबाद : टक्केवारी वाढत नसल्यामुळे लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार औरंगाबाद महानगरपालिकेकडून केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 35 हजार लसी पडून आहेत. लसी असूनही नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. याच कारणामुळे मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे यांच्याकडून हा विचार केला जातोय. (Municipal Corporation is thinking of compulsory Corona Vaccination to all Aurangabad citizens)
सर्वांना लसीकरण सक्तीचे
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. दुसरी लाट सरल्यामुळे लोक आता घराबाहेर पडू लागले आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबविने गरजेचे आहे. तसे प्रयत्न विविध जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, असे असले तरी औरंगाबादकर लसीकरणाविषयी सतर्क आणि जागरुक असल्याचे दिसत नाही. येथे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. याच कारणामुळे औरंगाबाद पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मनपा प्रशासक पांडे हे औरंगाबाद शहरात लसीकरण सक्तीचे करण्याचा विचार करत आहेत.
सध्या 35 हजार लसी पडून
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढत नाहीये. लोक लसीकरणासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात 35 हजार लसी पडून आहेत. लसी उपलब्ध असल्या तरी लोक लस टोचून घेत नाहीयेत. याच कारणामुळे सध्या औरंगाबाद शहरात सर्वांना सक्तीची कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विचार सुरु आहे.
21 जूनपासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन
सध्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 35 हजार लसी उपलब्ध आहेत. नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबाद मनपाकडून येत्या 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. सध्या यावर काम सुरु आहे.
लसीकरणाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हान
दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे या वेळेत तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची तयारी प्रशासनाकडून केली जातेय. याच काळात तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी व्हावी म्हणून लसीकणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवणे गरजेचे आहे. मात्र, औरंगाबादेत लसीकरणाची टक्केवारी वाढत नसल्यामुळे ही चिंतेची बाब असून त्यासाठी उपायोजना करण्याचे आव्हान येथील प्रशासनापुढे आहे.
इतर बातम्या :
फिरायला जाताय? मग पर्यटन राजधानी तुमच्यासाठी खुली!, कोणती पर्यटनस्थळं सुरु?
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना संकटात, योजनाला सिंचन विभागाचा तीव्र विरोध
(Municipal Corporation is thinking of compulsory Corona Vaccination to all Aurangabad citizens)