औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने स्वछ सर्वेक्षण 2022 च्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी औरंगाबाद शहरातील बांधकाम आणि विनाशक कचरा (Construction and Demolition Waste (C &D) उचलण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मनपा यांत्रिकी विभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात अधिकृतपणे वरील कामासाठीच्या नगररचना विभागा मार्फत शुल्काचा भरणा करून नवीन इमारत तयार होत असताना निर्माण झालेले वेस्टज बांधकाम साहित्य त्याचप्रमाणे अनाधिकृतपणे शहरातील रस्त्याच्या कडेला व अन्य ठिकाणी टाकण्यात आलेले डेब्रिज ,रोडारोडी ,वेस्टज बांधकाम साहित्य उचलून नेमून दिलेल्या ठिकाणी टाकण्याचे काम सातत्याने 24 x7 तत्वावर होणार आहे. यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, वाहने,वाहन चालक ,वर्कशॉप व पंक्चर युनिट कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
यांत्रिकी कार्यशाळेत कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. वर नमूद क्रमांक हा कंट्रोल रूमचा असेल व यासाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक 8551058080 हा कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगररचना विभागामार्फत अधिकृत बांधकाम परवानगी देताना C&D शुल्क भरणा करून प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगीच्या ठिकाणी निर्माण होणारे वेस्टेज बांधकाम साहित्य उचलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृतपणे टाकण्यात आलेले डेब्रिज, रोडारोडी,वेस्टेज बांधकाम साहित्य याबाबत महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक,स्वछता निरीक्षक, जवान, अथवा शहरातील नागरिक यांचेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन तक्रारींचे ठिकाण ,तक्रारदाराचे नाव व मोबाइल क्रमांक नोंदवून तक्रार संबंधित वाहन चालक यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
इतर बातम्या