विद्यापीठ नामविस्ताराची 17 वर्षे पूर्ण; औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, शहिदांना अभिवादन
14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामविस्तार दिन आहे. 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव बदलण्यात आले. या नामविस्ताराच्या लढ्यात शहीद झालेल्यांचे स्मारक उभारण्याची योजना असून स्मारकाचे भूमीपूजन आज सकाळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांच्या हस्ते करण्यात आले. आज विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कुलगुरुंच्या हस्ते भूमीपूजन
14 जानेवारी रोजी शहीद स्मारकाचे उद्घाटन करण्याचे कुलगुरूंनी जाहीर केले होते. मात्र जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोरोना नियमावलीअंतर्गत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे कार्यक्रम घ्यावा की नाही, अशी द्विधा मनःस्थिती कुलगुरुंसमोर झाली होती. मात्र आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनीही कुलगुरुंच्या दालन गाठून हा कार्यक्रम झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. अखेर आज शुक्रवारी सकाळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नामविस्तार लढ्यातील शहीदांच्या स्मारकाचे भूमीपूजन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पार पडले.
नामांतराच्या लढ्याला 17 वर्षे पूर्ण
औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यासाठी तब्बल17 वर्षांचा लढा द्यावा लागला. 1978 मध्ये या नामांतर लढ्याला सुरुवात झाली. यासाठी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना तुरुंगात जावे लागले. ज्या मराठवाड्यात बाबासाहेबांमुळे गोरगरिबांना शिक्षण मिळतेय, त्यांचे नाव विद्यापीठाला द्यायला हवं, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर 14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार हे मुख्यमंत्री पदी असताना विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिवसाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.
इतर बातम्या-