Nanded | संजय बियाणींच्या हत्येनंतरही खंडणीसाठी अनेकांना धमक्या, पुढे येऊन तक्रार द्या, नांदेड पोलिसांचे आवाहन
नांदेड : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्याववसायिक (Builder) संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येनंतर शहरात खंडणीसाठी अनेकांना धमक्या आल्या. बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ फरांदे आणि श्याम गुप्ता या दोन बांधकाम व्यावसायिकांना एक कोटींच्या खंडणीसाठी पत्र पाठविण्यात आले होते. त्यामुळे नांदेडमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर पोलीस (Nanded police) तपासात हे पत्र पैसे उकळण्यासाठी गुप्ता यांच्या नातेवाईकाने पाठविल्याचे उघड […]
नांदेड : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्याववसायिक (Builder) संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येनंतर शहरात खंडणीसाठी अनेकांना धमक्या आल्या. बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ फरांदे आणि श्याम गुप्ता या दोन बांधकाम व्यावसायिकांना एक कोटींच्या खंडणीसाठी पत्र पाठविण्यात आले होते. त्यामुळे नांदेडमध्ये खळबळ माजली होती. त्यानंतर पोलीस (Nanded police) तपासात हे पत्र पैसे उकळण्यासाठी गुप्ता यांच्या नातेवाईकाने पाठविल्याचे उघड झाले असून त्याला अटक करण्यात आल्याची माहीती विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिली. तसेच शहरात इतरही कुणाला धमकीचे किंवा खंडणी मागण्यासाठीचे फोन आले असतील तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
धमकी देणाऱ्या एकाला अटक
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी दोघांनी घरासमोर गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती, या प्रकरणाचा तपास सुरू असताना शहरात आणखी सहा जणांना खंडणी साठी फोन आले. त्यात बांधकाम व्यवसायात भागीदार असलेल्या कौस्तुभ फरांदे आणि श्याम गुप्ता यांना ही 1 कोटींच्या खंडणी साठी पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र पोस्टाने पाठविले होते. पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर गुप्ता यांचा नातेवाईक पुरूषोत्तम मानगुलकर याने पैसे उकळण्यासाठी हे पत्र पाठविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, अनेकांना धमकीचे पत्र हे वैयक्तिक वादातुन त्रास होण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. नागरिकांनी न घाबरता तक्रारी कराव्यात असे आवाहन तांबोळी यांनी केले.
खा. चिखलीकर यांनाही धमकी
दरम्यान, भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीदेखील आपल्याला धमकीचे पत्र आल्याचा खळबळजनक खुलासा दोन दिवसांपूर्वी केला. चिखलीकर यांनी कुख्यात गुंड रिंदा याच्या नावाने त्यांना आलेले सात महिन्यांपूर्वीचे पत्र सादर केले. यात त्यांना दहा कोटींची खंडणी मागण्यात आली होती. पोलिसांना यासंबंधी माहिती देऊनही त्यांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे. राज्यात नांदेडमध्ये प्रचंड अवैध धंदे सुरु असून पोलीस हप्ते गोळा करण्यात मश्गूल असल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे.
इतर बातम्या-