Nanded: नांदेडमध्ये गोदावरी बँकेच्या मुख्यालयाचं आज उद्घाटन, शरद पवारांची उपस्थिती, पारा 44 अंशावर, भव्य AC मंडप

कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्यातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत .

Nanded: नांदेडमध्ये गोदावरी बँकेच्या मुख्यालयाचं आज उद्घाटन, शरद पवारांची उपस्थिती, पारा 44 अंशावर, भव्य AC मंडप
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 6:00 AM

नांदेडः नांदेडमध्ये आज गोदावरी अर्बन  (Godawari urben Bank)या बँकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री तथा नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या या पाहुण्यांना उन्हाची झळ लागू नये म्हणून गोदावरी अर्बन बँकेकडून मोकळ्या मैदानात चक्क वातानुकूलित मंडप बनवण्यात आलाय. नागपूर इथल्या मंडप डेकोरेशन  करणाऱ्या खाजगी कंत्राटदाराकडून खुल्या जागेवर हे वातानुकूलित सभागृह उभारण्यात आले आहे. सध्या नांदेडमध्ये कमाल तापमान 44 अंशापर्यत गेल्याने वातानुकूलित मंडप उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) तसेच भाजपचे मंत्री नितीन गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.

आज दुपारपर्यंत वाहतुकीत बदल

नांदेड शहरात शनिवार 14 मे 2022 रोजी गोदावरी अर्बन बँकेचा उद्घाटन सोहळा आहे. तसेच भगीरथनगर येथील जाहीर सभेच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 14 मे 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लागू राहील. शेतकरी चौक, दिपनगर, छत्रपती चौकाकडे जाण्या-येण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद राहिल. या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शेतकरी चौक- कॅनाल रोड- छत्रपती चौक तसेच शासकीय विश्रामगृह- पावडेवाडी चौक- मोर चौक- छत्रपती चौक पर्यंत, छत्रपती चौक- मौर चौक- पावडेवाडी नाका हा राहिल. शनिवार 14 मे रोजी वाहुकीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

5 हजार लोकांसाठी आसनव्यवस्था

गोदावरी अर्बनने अत्यंत कमी कालावधीमध्ये सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकिक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून त्याच विश्वासाला पुढे नेण्यासाठी गोदावरी अर्बनने आपला कार्यविस्तार वाढविला असून सभासद ,ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह गोदावरी अर्बन सज्ज झाली असून त्याच दिशेचे पाऊल म्हणजेच ” सहकारसूर्य ” या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेले मुख्यालय होय. याच मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता तरोडा नाका , पूर्णा रोड नांदेड येथे  मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे .या भव्यदिव्य सोहळ्याला  सर्वच क्षेत्रातील मान्यवर  दिगज्ज मंडळी उपस्थित राहणार आहेत. सहकार सूर्य हे मुख्यालय हे खऱ्या अर्थाने नांदेडच्या वैभवात भर टाकणारे आहे . उन्हाळ्याचा वाढता त्रास पाहता कार्यक्रमासाठी 5 हजार लोक बसतील अश्या वातानुकूलित मंडपाचे नियोजन करण्यात आले असून भगीरथ नगर येथे  1 हजार  चारचाकी वाहने थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सहकार परिषदेचेही आयोजन

कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्यातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत . यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे,  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर , महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,  फेडरेशन ऑफ  मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर हे सामान्यांसाठी सहकारी चळवळीची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.सोबतच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थित राहणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.