Nanded | तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास, तरुणाची आत्महत्या, नांदेड स्थानकावर धक्कादायक घटना

मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Nanded | तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास, तरुणाची आत्महत्या, नांदेड स्थानकावर धक्कादायक घटना
रेल्वेच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:24 PM

नांदेड | नांदेड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी धक्कादायक घटना घडली. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास (Suicide) घेऊन एकाने आत्महत्या केली आहे. सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपोवन एक्सप्रेस (Tapovan Express) मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. गाडीच्या एका बोगीच्या खिडकीला लटकून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यानंतर याविषयीची माहिती तत्काळ रेल्वे स्टेशन पोलीसांना देण्यात आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय 25 वर्षांच्या आसपास असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार (Nanded police) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कशी उघडकीस आली घटना?

बुधवारी सकाळी तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर यार्डमध्ये उभी होती. या गाडीच्या एक डब्यातील शौचालयाच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला मोठ्या रुमालाने अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना रेल्वे प्रशासनाने कळवली. त्यानंतर उनवणे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार या घटनास्थळी दाखल झाल्या. सदर मृतदेह रेल्वेच्या खिडकीवरून खाली उतरवून पंचनामा करून तपासणी करण्यात आली. सदर इसमाच्या खिशात ओळख पटवणारे काहीही पुरावे सापडले नाहीत. मात्र तो 25 वर्षे वयाचा असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

ओळख पटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

दरम्यान, पोलिसांनी सदर इसमाची ओळख पटल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मयताचा चेहरा गोल, रंग सावळा, उंची साडेपाच फूट, दाढीमिशी बारीक, केस काळे, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट असा पेहराव आहे. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

इतर बातम्या-

Aai Kuthe Kay Karte: ‘पाकीटमार’ पत्रकारांमुळे जोगळेकर-केळकरांच्या कार्यक्रमात तमाशा, संजना देशमुखवर डाव कसा उलटला?

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.