“वाकडं बघणाऱ्या दिल्लीश्वरला याच मातीत गाडू”; सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा घणाघात
जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत त्यांनी भाजपचा वर्धापन दिन आता 1 एप्रिल रोजी साजरा करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राची चेष्टा भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून चालू केली आहे. त्यामुळे आता भाजपचा वर्धापन दिन साजरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करताना हा मराठवाडा क्रांतिकाराकांचा मराठवाडा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यानंतर अथक परिश्रमातून 17 सप्टें 1948 रोजी खऱ्या अर्थाने मराठवाड्याला मुक्ती मिळाली असल्याचे सांगत ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट असल्याचे मत त्यांना यावेळी मांडले.
धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले या सरकारच्या विरोधाताली पहिली सभा ही क्रांतिकारक संभाजीनगरमध्ये होत आहे. मात्र या मराठवाड्याचा उज्ज्वल इतिहास आहे.
ज्या ज्यावेळी दिल्लीश्वराने महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून पाहिली आहे. त्यात्यावेळी या मातीत गाडायची ताकद या मराठवाड्याने दाखवून दिली आहे असा इशारा भाजपला त्यांनी दिला आहे.
वज्रमूठ सभेच्या तारखेलाच मुख्यमंत्र्यांची एक यात्रा होत आहे. त्यांची ताकद दाखवण्यासाठी ही यात्रा होते आहे की सरकार धास्तावलं आहे म्हणून ही यात्रा होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जिथं जिथं वज्रमूठ जाईल तिथं तिथं कोणती कोणती ना यात्रा मुख्यमंत्री सुरु करत आहेत. इतकं हे सरकार धास्तवलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिले आहे. मात्र या अर्थसंकल्पामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल फुल केले आहे असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.