“एवढ्या मोठ्या सभेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो नाही”; शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे गटाला सुनावलं
छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढी मोठी सभा होत आहे, तरीही त्या सभेच्या पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब करण्यात आला आहे.
संभाजीनगर : महाविकास आघाडीची संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत असतानाच विरोधकांना एकीचे बळ दाखवण्यासाठी ही वज्रमूठ असल्याचेही मविआच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. ही सभा आज होत असली तरी गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेची जोरदार चर्चा होत होती. महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत असल्याने सत्ताधाऱ्यांसह राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीची ही सभा आज होत असली तरी गेल्या काही दिवसांपासून या सभेची पोस्टर औरंगाबादसह अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्या पोस्टरवरून आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाला छेडले आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीवर टीका करत असताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाण साधला आहे.
महाविकास आघाडीची ही संयुक्त सभा होत असताना आणि एवढी मोठी गर्दी होत असली तरी सभेच्या पोस्टरवरून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटा का लावण्यात आला नाही असा सवालही त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीची ही वज्रमूठ मोठी सभा होत असतानाही त्या सभेच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का लावण्यात आला नाही.
हे आज जोरदारपणे सभा घेत असले तरी ठाकरे गटाला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढी मोठी सभा होत आहे, तरीही त्या सभेच्या पोस्टरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो गायब करण्यात आला आहे.
तरीही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सवाल उपस्थित करून जाब विचारण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही का असा सवालही संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.