औरंगाबादः 30 नोव्हेंबरपर्यंत100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Aurangabad collector) तातडीचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील फक्त 55 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या अत्यंत कमी म्हणजे 22 टक्के एवढीच आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानदेखील बुधवारी या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी मंगळवारी रात्री ‘नो व्हॅक्सीन नो रेशन’ चे आदेश काढले आहेत. तसेच लस घेतल्याशिवाय शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांना डिसेंबरचे वेतन देऊ नये असेही बजावले आहे.
सोमवारप्रयंत औरंगाबाद जिल्ह्यातील 23,80,175 लोकांनी पहिला तर 07, 28,435 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण फक्त 22.59 टक्के एवढे आहे. देश पातळीवर तुलना करता ज्या जिल्ह्यांचे लसीकरण कमी झाले आहे, अशा 45 जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. यात औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नंदुरबार, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे. या आढाव्याच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नो व्हॅक्सिन नो रेशन’चा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सध्याच्या घडीला 802 रेशनची दुकाने आहेत. रेशन कार्डधारकांची संख्या 5 लाख 50 हजार एवढी आहे. एका कार्डवर चार ते पाच जणांची नावे असतात. म्हणजेच किमान 22 लाख लोक रेशन दुकानातील अन्नधान्यावर अवलंहून आहेत. या लोकांना लसीकरण नसेल तर रेशन न देण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या जातील. या योजनेला यश आले तर मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा आकडा वाढू शकतो, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यासह शहरातील विविध शासकीय, खासगी कार्यालये, संस्था, शिक्षण संस्थांमध्येही लसीकरण अनिवार्य करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे-
इतर बातम्या-