Gold Price: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घट, वाचा औरंगाबादच्या सराफ्यातील भाव अन् सोबत Gold Gyaan!
आज बुधवार म्हणजेच 03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले.
औरंगाबादः दिवाळीच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात चांगलीच घट झालेली दिसून येत आहे. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुवर्णरुपी लक्ष्मीची सर्वत्र पूजा केली जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. व्यापाऱ्यांच्या दुकानात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver price ) नाण्यांची पूजा केली जाते. यानिमित्ताने दिवाळीच्या काळात एक मोठा वर्ग सोन्याच्या खरेदीसाठी बाजारात आलेला दिसतो. औरंदगाबादच्या बाजारातही (Aurangabad Gold) सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या या उत्साहात सोन्याचे दरही नियंत्रणात किंबहुना काहीसे घसरतीच्या दिशेने असल्याने बाजारात आणखी उत्साहाचे वातावरण आहे.
औरंगाबादचे आजचे भाव काय?
आज बुधवार म्हणजेच 03 नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,250 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,000 रुपये एवढे दिसून आले. चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे चित्र दिसून आले. यापूर्वी 02 नोव्हेंबर रोजी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 47,650 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,400 रुपये प्रति तोळा एवढे होते. तर एक किलो शुद्ध चांदीचे दरही 67,500 रुपये एवढे नोंदवले गेले. 31 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले. 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. एकूणच सोन्याचे दर सध्या घसणीच्या दिशेने आहेत, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सोन्याच्या भावात 3000 रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.
Gold Gyaan: पांढरे सोने आणि पिवळे सोने काय असते?
सोने हा धातू अत्यंत मऊ असल्यामुळे तो दीर्घकाळ हाताळताना झिजतो. तसेच सोने या धातूमध्ये ताण किंवा घाव सहन करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे सोन्यापासून दागिने बनवताना सोन्याचे मिश्रधातू वापरतात. दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारे सोने हे चांदी, तांबे आणि अल्प प्रमाणात जस्त या धातूंबरोबर मिश्रधातूंच्या रुपात वापरतात. मिश्रधातूंना वेगवेगळ्या पिवळसर छटा असतात. म्हणून त्यांना पिवळे सोने म्हणतात. सोन्यासोबत निकेल, तांबे, व जस्त यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या मिश्रधातूंना पांढरा रंगत येतो. त्यांना पांढरे सोने म्हणतात. सोन्याच्या मिश्रधातूंमध्ये चांदीचे प्रमाण जसे वाढत जाते, तसा पिवळसर ते पांढरा रंग होत जाते. ज्या वस्तूमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त चांदी असते, त्या वस्तू पांढऱ्याच दिसतात. सोन्याच्या काही मिश्रधातूंचा रंग लाल किंवा हिरवटदेखील असतो.
इतर बातम्या-