उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या मतदानाला सुरुवात, ओमराजे निंबाळकर व राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

उस्मानाबाज जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या मतदानाला सुरुवात, ओमराजे निंबाळकर व राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:55 AM

उस्मानाबाद | ग्रामीण भागातील नागरिकांची अर्थवाहिनी म्हणवल्या जाणाऱ्या जिल्हा बँक निवडणुकांना (Osmanabad District Co-operative Bank) राजकारणात महत्त्वाचं स्थान असतं. उस्मानाबादच्या राजकारणातही जिल्हा बँकेला प्रचंड महत्त्व आहे. आज येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची पांचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. येथील 15 संचालक पदाच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर हे मतदान सुरु आहे. जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांपैकी 5 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. आता 10 जागांवरील 808 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar), आमदार कैलास पाटील यांच्यासह भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsingh Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची लढत!

या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा मध्ये लढत झाली असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भूम तालुका सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे,परंडा तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उमरगा तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे नेते तथा माजी चेअरमन बापूराव पाटील,वाशी तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे विक्रम सावंत आणि तुळजापूर तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण बिनविरोध निवडून गेले आहेत.

जिल्हा बँकेची स्थिती काय?

तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी, श्री तुळजा भवानी सहकारी साखर कारखाना नळदूर्ग, तुळजापूर यांच्यासह इतर उद्योजकांना आणि नागरिकांना 750 कोटींच्या आसपास कर्ज दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सद्या अडचणीत आली आहे. मात्र दिवळखोरीत निघालेल्या बँकेच्या संचालकपदी विराजमान होण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार आटापिटा करताना दिसत आहेत.

उद्या मतमोजणीनंतर ठरणार भवितव्य

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या 10 संचालक पदाच्या जागेसाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते यामध्ये शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी महाविकास आघाडी व विरोधी गटातील भाजपच्या उमेदवारांसह 2 अपक्षांचा समावेश आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 पासून मतदान केंद्रावर सुरु मतदान झाले मतदानासाठी उस्मानाबाद 196 मतदार ,तुळजापूर 97 ,परंडा 86, भूम 85, वाशी 53 ,कळंब 130,उमरगा 107 ,लोहारा तालुक्यात 54 सकाळी असे 808 मतदार असून 8 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या दिनांक 21 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथील महसूल भवनात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली.

इतर बातम्या-

PM Kisan Yojna : योजनेचा निधी लाटला, आता परस्पर काढूनही घेतला जाणार, लाभार्थी नसूनही ‘लाभ’ घेणारे कोण?

अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.