Osmanabad | हे कसले लोकप्रतिनिधी? खासदार ओमराजेंच्या शेतात 24 तास वीज, शेजारचे शेतकरी लोडशेडिंगने हैराण…

ओमराजे निंबाळकरांना प्रतिक्रिया विचारली असता, हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. मात्र लोकप्रतिनिधींनीच असा दुजाभाव केल्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.

Osmanabad | हे कसले लोकप्रतिनिधी? खासदार ओमराजेंच्या शेतात 24 तास वीज, शेजारचे शेतकरी लोडशेडिंगने हैराण...
शेतकऱ्यांची महावितकरणकडे तक्रारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 5:20 PM

उस्मानाबाद :एकीकडे उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील शेतकरी वीज लोड शेडींगने हैराण झालेला असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर (Om Raje Nimbalkar) यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. ओमराजेंच्या शेतात तेर येथील एक्सप्रेस फिडरवरून डीपी टाकण्यात आली असून या फिडरच्या माध्यमातून ओमराजे यांच्यासह काही शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात आहे. तर त्याच भागातील शेतकऱ्यांना (Farmers) मात्र वीज मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी व सामान्य शेतकरी असा दुजाभाव होत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. याबद्दल ओमराजे निंबाळकरांना प्रतिक्रिया विचारली असता, हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. मात्र लोकप्रतिनिधींनीच असा दुजाभाव केल्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत.

खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी..

आम आदमी पार्टीने आज ओमराजे यांना 24 तास वीज मिळत असल्याचा आरोप आम आदमीने केला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी वीज नसल्याने वैतागला आहे, शेतात पाणी असले तरी केवळ वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, दिवसरात्र विजेची वाट पाहावी लागत आहे. सामान्य शेतकरी यांनी ही विजेसाठी बिकट अवस्था असताना शिवसेनेचे खासदार ओमराजे यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. तेरणा साखर कारखानासाठी असलेल्या विशेष एक्सप्रेसवरून वरील डिपी वरून ओमराजे यांच्या शेतात वीज कनेक्शन देण्यात आला असून या फिडरला 24 तास वीज असते शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास वीज मिळते. खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी स्तिथी असून या दुजाभाव मुळे शेतकरी वैतागला आहे तर खासदार ओमराजे यांचे प्रकरण असल्याने अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करित आहेत. एक्सप्रेस फिडर हे तेरणा कारखाना, पाणी पुरवठा योजना यांच्यासाठी असते मात्र खासदार ओमराजे यांना या फिडरचा विशेष लाभ दिल्याचा आरोप आपचे जिल्हाध्यक्ष खोत यांनी केला आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड अजित खोत, तालुका उपाध्यक्ष राजपाल देशमुख यांच्यासह ढोकी, गोवर्धनवाडी, रुई, खामगाव, कावळेवाडी, बुकनवाडी या भागातील शेतकऱ्यांनी आज ढोकी येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोड शेडींग च्या दुजाभाव बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान याबाबत खासदार ओमराजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...