Osmanabad | उस्मानाबादेत महागाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, डोकेदुखीसाठी झंडू बाम वाटप, बैलगाडीत मोटरसायकल
एकिकडे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात (Kirit Somayya) महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे तर उस्मानाबादमध्ये (Osmanabad) राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Activists) कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध केला.
उस्मानाबाद | एकिकडे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात (Kirit Somayya) महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे तर उस्मानाबादमध्ये (Osmanabad) राष्ट्रवादीने आंदोलन केले आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Activists) कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध केला. वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारमधील भाजप जबाबदार असून यामुळे सामान्यांची गळचेपी होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. तसेच प्रत्येक गोष्टीत वाढती महागाई ही डोकेदुखी ठरली असून ही डोकेदुखी थांबण्यासाठी आंदोलकांनी झंडूबामचे वाटप केले. उस्मानाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून झंडू बाम वाटप
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. महागाईमुळे सामान्यांची डोकेदुखी वाढली असून त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणे आंदोलन केले. तसेच नागरिकांची डोकेदुखीपासून सुटका व्हावी याकरिता झंडू बाम वाटप करण्यात आले.
बैलगाडीत मोटरसायकल
पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढत असल्याने याविरोधातही राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांनी बैलगाडीत मोटरसायकल ठेवून आणली. तसेच आंदोलकांनी यावेळी डोक्यावर गॅसचा सिलिंडर उचलून आणला. या महागाईसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
इतर बातम्या-