Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad Corona Update | कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टर पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका डॉक्टरला कोरोना लशीचे 2 डोस घेऊनही कोरोना झाल्याने (Female Doctor Found COVID Positive) खळबळ उडाली आहे.

Osmanabad Corona Update | कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टर पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ
Tuljapur Hospital
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 2:32 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका डॉक्टरला कोरोना लशीचे 2 डोस घेऊनही कोरोना झाल्याने (Female Doctor Found COVID Positive) खळबळ उडाली आहे. कोरोनाचे 2 डोस घेतल्यानंतर ही महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या डॉक्टर बालरोगतज्ञ म्हणून काम करीत असून त्यांना तापीची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांनी दिली. विशेष म्हणजे या महिला डॉक्टरांना कोरोना लसीचा दुसरा डोस देऊन एक आठवडा झाला होता. सध्या त्या महिला डॉक्टरची तब्येत ठीक आहे (Tuljapur Female Doctor Found COVID Positive After Taking Both The COVID Vaccine).

तुळजापुरात रविवारी जनता कर्फ्यू

गेल्या 15 दिवसांपासून तुळजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता डॉक्टर ही पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहता तुळजाभवानी मंदिरासह जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे दर रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तुळजापुरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. तुळजापूर येथील अनेक व्यापारी, भाविक पुजारी सर्रास विनामस्क असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले विनामस्क वावरत आहेत त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याचा आलेख हा वाढताच

2 मार्च – 40 रुग्ण

3 मार्च – 16 रुग्ण

4 मार्च – 45 रुग्ण

5 मार्च – 26 रुग्ण

6 मार्च – 30 रुग्ण

7 मार्च – 49 रुग्ण

8 मार्च – 16 रुग्ण

9 मार्च – 38 रुग्ण

10 मार्च – 24 रुग्ण

11 मार्चला – सर्वाधिक 58 रुग्ण

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 296

उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 865 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 680 रुग्ण सापडले म्हणजेच रुग्ण सापडण्याच दर 13.67 टक्के आहे. जिल्ह्यात 16 हजार 758 रुग्ण बरे झाले असून 95 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे.कोरोना संकटात आजवर 586 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.32 टक्के मृत्यू दर आहे.

…तर तुळजाभवानी मंदिर बंदबाबत कटू निर्णय घेणार – जिल्हाधिकारी

उस्मानाबाद जिल्हा हा पर्यटन पूरक जिल्हा असून तुळजाभवानी मंदिर सध्या तरी पूर्णतः बंद करण्यात येणार नाही मात्र भाविक , पुजारी व व्यापारी यांनी मास्कचा व नियमावलीची अंमलबजावणी न केल्यास कोरोना रुग्णाची संख्या वाढून स्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे तत्कालीन स्थिती पाहून कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते असा सूचक इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. लॉकडाऊनचे चक्र हे न परवडणारे असून सर्वानी गांभीर्य ओळखून वागले तर कोरोना नियंत्रण शक्य आहे. तुळजापूरसह इतर धार्मिक क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी पुजारी व भाविक यांच्या कोरोना तपासणी करण्यात येणार असून धार्मिक व पर्यटन क्षेत्रात नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. (Tuljapur Female Doctor Found COVID Positive After Taking Both The COVID Vaccine)

लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सज्ज

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी ३ महिने पुरेल इतका औषध साठा , ऑक्सिजन पुरवठा, तपासणी व उपचारासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर चाचणीची संख्या वाढविणे तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार पद्धतीवर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण लॉकडाऊन लागू नये ही प्रशासनाची इच्छा असल्याची भूमिका जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसात रुग्णाची संख्या तिपटीने वाढत आहे त्यामुळे १८ पोलीस स्थानकाच्या हद्दीत महसूल पोलीस विभागाची संयुक्त पथके प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाईसाठी नेमण्यात आली आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंतच्या नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तपासणी संख्या वाढावी यासाठी कोरोना टेस्टिंग लॅब नव्याने जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 10 डेडिकेटेड कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असुन 1400 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात 1200 ऑक्सिजन बेड तर 200 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे.

Tuljapur Female Doctor Found COVID Positive After Taking Both The COVID Vaccine

संबंधित बातम्या :

कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

कोरोना लस घेतल्यानंतर त्रास होतो ? वाचा पाच संभाव्य साईड ईफेक्ट्स

Vaccine precautions: सावधान! कोरोना लस घेण्यापूर्वी किंवा नंतर दारू प्यायल्यास होणार ‘हे’ परिणाम

Corona Vaccine : कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सची भीती वाटतेय? जाणून घ्या लस निर्मिती कंपन्यांच्या महत्वाच्या सूचना

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.