अमित शहा, जेपी नड्डांना भेटल्यानंतरही पंकजा मुंडे नाराज?; रावसाहेब दानवेंनी केलं मोठं विधान!

भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर पंकजा या नाराज असल्याची चर्चा सुरूच आहे. (pankaja munde is Not upset with party, says raosaheb danve)

अमित शहा, जेपी नड्डांना भेटल्यानंतरही पंकजा मुंडे नाराज?; रावसाहेब दानवेंनी केलं मोठं विधान!
raosaheb danve
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 12:50 PM

औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर पंकजा या नाराज असल्याची चर्चा सुरूच आहे. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पडदा पाडला आहे. पंकजा मुंडे मला भेटल्या. त्या नाराज आहेत असं अजिबात वाटलं नाही, असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. (pankaja munde is Not upset with party, says raosaheb danve)

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच औरंगाबादला आले होते. यावेळी रेल्वे स्थानकात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे मंत्री जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. हे शक्तिप्रदर्शन नाही. राजकीय कार्यकर्ता फिरला पाहिजे, प्रश्नांची जाण होते. त्यासाठी या यात्रा सुरू आहेत, असं दानवे यांनी सांगितलं.

डॉ. भागवत कराड यांच्या यात्रेवेळी पंकजा मुंडे समर्थकांनी घोषणा दिल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटत नाही अशा काही घोषणा दिल्या. त्या काही शिकवलेल्या घोषणा नव्हत्या. राजकीय संमेलनात असे काही लोक असतात, ते घोषणा देतात. मी असं म्हणणार नाही की ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत, असं सांगतानाच पंकजा मला, जेपी नड्डा आणि अमित शहा यांना भेटल्या. त्यांच्या वागण्या बोलण्यातून आणि व्यवहारातून त्या नाराज आहेत असं काही वाटलं नाही. एखादा राजकीय नेता राज्याच्या मंत्र्यांना भेटतो. त्यामुळे त्यातून राजकीय अर्थ काढणं काही योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

तर मुंबई-औरंगाबाद अंतर दीड तासाचं होईल

मी आज पहिल्यांदा रेल्वे मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात आलो. माझ्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. त्यांनी माझा सत्कार केला. मी कार्यकर्त्यांच्या बळावर इथपर्यंत पोचलो. मलाही आनंद वाटला. मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. जिथे इंग्रज होते तिथे रेल्वेचं जाळ तयार झालं. मराठवाड्यातल्या रेल्वेचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवणार आहे. नागपूर-मुंबई हा सर्वाधिक वापरला जाऊ शकणार रेल्वे मार्ग बनू शकतो. तो बुलेट ट्रेन मार्ग जर तयार झाला तर मुंबईहून औरंगाबादला दीड तासात आणि नागपूरला 3 तासात आपण पोचू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम ते होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं.

ओबीसींना भाजपपासून फोडणं अशक्य

आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. या सरकारने बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झालं. पण आत राज्याला अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा उपयोग करून राज्यांनी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आता ते म्हणतायत 50 टक्केची कॅप उठावा. पण आजपर्यंत काँग्रेस सरकार होते त्यांनी आजपर्यंत ही कॅप का उठवली नाही?, असा सवाल करतानाच भाजपमध्ये सर्व समाजचे लोक आहेत. त्यांच्या पक्षात आहेत का वेगवेगळ्या समाजाचे लोक. आम्ही सतत ओबीसी समाजाला न्याय दिला. पण आता हे ओबीसी समाजाला भाजपपासून फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होणार नाही, असं ते म्हणाले.

अमर, अकबर, अँथोनीचं सरकार

या सरकारला अपयश आलं की लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे सरकार राज्यपाल आणि केंद्र सरकारवर टीका करत असतं. राज्यातील जातीय स्थिती या लोकांनी बिघडवली आहे. नारायण राणे समिती नेमून आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. समितीला आरक्षणाचा अधिकार असतो का? आघाडी सरकार फसवणूक करत आहेत. मराठा समाज या सरकारला माफ करणार नाही, असं सांगतानाच हे ॉतीन पक्षाचं अमर, अकबर, अँथोनीचं सरकार आहे, इथे प्रत्येक जण आपल्या खात्याचा मालक आहे. या सरकार बद्दल प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं. (pankaja munde is Not upset with party, says raosaheb danve)

संबंधित बातम्या:

VIDEO : उद्धवजी, माझ्या-आई वडिलांना वाचवा, पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्याची आर्त हाक!

‘ते’ ताट राज्य सरकारच हिसकावून घेतंय; चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांवर पलटवार

शरद पवारांची राज्यपालांवर वयावरून बोचरी टीका; राज्यपाल म्हणतात, टीका करायलाच हवी का?

(pankaja munde is Not upset with party, says raosaheb danve)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.