औरंगाबादची वाहतूक कोंडी सोडवण्याचा मोठा प्लॅन, पे अँड पार्क अन् हॉकर्स झोनची व्यवस्था करणार, काय आहे नियोजन?

शहरात गर्दीच्या वेळी पे अँड पार्क ही योजना खासगी ठेकेदारांच्या माधअयमातून राबवण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर चौक, उस्मानपुरा, निराला बाजार, सूतगिरणी चौक आणि अजून एका बाजारपेठेत पहिल्या टप्प्यात ही सोय केली जाईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

औरंगाबादची वाहतूक कोंडी सोडवण्याचा मोठा प्लॅन, पे अँड पार्क अन् हॉकर्स झोनची व्यवस्था करणार, काय आहे नियोजन?
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 4:00 AM

औरंगाबादः शहराची वाहतूक कोंडी (Aurangabad traffic) सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन पार्किंग आणि हॉकर्स पॉलिसी (Parking and hawkers policy) निश्चित करण्यात आली आहे. अर्थात सरकारच्या मंजुरीनंतर आणि नागरिकांच्या आक्षेपानंतर त्यावर नियोजन होईल. या पार्किंगच्या नव्या धोरणात प्राथमिक टप्प्यात शहरातील पाच ठिकाणी पे अँड पार्क सेंटर्स उभारले जातील. तसेच तीन ठिकाणी पेड हॉकर्स झोन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तीन महिन्यात हे धोरण लागू होईल, अशी माहिती मनपातील (Aurangabad municipal corporation) सूत्रांनी दिली. राज्यातील सर्वच शहरांत पार्किंग पॉलिसीवर काम सुरु आहे. मात्र अद्याप कुठेही अंमलबजावणी झालेली नाही. औरंगाबादेत नियोजनानुसार, सर्वकाही झाले तर पार्किंग धोरण लागू करणारे औरंगाबाद हे पहिले शहर ठरेल, असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

हॉकर्सची समस्या काय, झोन कुठे उभारणार?

शहरात सध्या 14 हजारांपेक्षा जास्त फेरीवाले अर्थात हॉकर्स आहेत. हातगाड्यांवर वस्तू विकणारे आणि रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्यांचा यात समावेश आहे. तर दहा लाखांपेक्षा जास्त खासगी वाहने आहेत. गुलमंडी ते पैठण गेट रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडचण होते. याबाबत व्यापाऱ्यांनी वारंवार मुद्दा उपस्थित केला. मात्र ठोस उपाय करणे शक्य झाले नाही. शहरात एक निश्चित हॉकर्स झोन असावा आणि बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांसाठी विशेष पार्किंगची सोय असावी, याचा विचार नव्या पार्किंग धोरणात करण्यात आला. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणी हॉकर्स झोन आहेत. कॅनॉट, टीव्ही सेंटर, पुंडलिक नगरात हॉकर्ससाठी जागा उपलब्ध होणार आहेत. या प्रत्येकाला स्वतंत्र आयकार्ड आणि जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजूला वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घेऊन जागा निश्चित केल्या जातील. फेरीवाल्यांकडून कमीत कमी शुल्क वसूल करण्यात येईल. साधारण दहा रुपये प्रतिदिन एवढे माफक शुल्क असेल. मनपाचे उपायुक्त सौरभ जोशी आणि अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वात हे धोरण यार करण्यात आले आहे.

पे अँड पार्किंगची योजना काय?

शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पे अँड पार्किंगची सोय केली जाईल. बहुमजली पार्किंगचेही नियोन होते, मात्र त्याला फार प्रतिसाद मिळत नसल्याचा इतर शहरांचा अनुभव आहे. त्यामुळे ही योजना तूर्तास मागे पडली. शहरात गर्दीच्या वेळी पे अँड पार्क ही योजना खासगी ठेकेदारांच्या माधअयमातून राबवण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर चौक, उस्मानपुरा, निराला बाजार, सूतगिरणी चौक आणि अजून एका बाजारपेठेत पहिल्या टप्प्यात ही सोय केली जाईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

इतर बातम्या-

VIDEO: फडणवीस बोलत असताना महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…?; हा व्हिडीओ पाहाच

Nagpur Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कामगाराचे साहित्य चोरले, आरोपी अटक

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.