Aurangabad Suicide : औरंगाबादमध्ये गर्भवतीची आत्महत्या; रुग्णालयात नातेवाईकांमध्ये हाणामारी
जयश्री यांनी आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्रीला फासावरून खाली उतरवत तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.
औरंगाबाद : वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या दोन महिन्यांच्या गर्भवती महिले (Pregnant Women)ने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज पहाटे 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. जयश्री असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर घाटी रुग्णालयात सासर आणि माहेरच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी (Fighting) झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.
विवाहितेच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांमध्ये हाणामारी
जयश्री यांनी आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयश्रीला फासावरून खाली उतरवत तात्काळ घाटी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. जयश्री मृत झाल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालय गाठले. नातेवाईकांनी शवविच्छेदन गृह गाठले. यावेळी नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली. परिस्थितीचे गाभीर्य पाहता वाद वाढू नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्रीच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pregnant woman commits suicide in Aurangabad, Fighting between relatives at the hospital)