Video: सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा..सत्ताधारी आमदारांनी कोश्यारींविरोधात विधानसभेत रणशिंग फुकलं
औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच समर्थांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, असं वक्तव्य केलं, यावरुन महाविकास आघाडी सरकार राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे.
मुंबईः महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं आज अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष परस्परांमध्ये भिडले आहेत. एकिकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घ्या म्हणून भाजप आक्रमक झालेली दिसली. तर सावित्रीबाई फुल्यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी (ShivSena MLA) विधानसभेत रणशिंग फुंकलं. महावाकिसा आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळाबाहेर एकत्र येत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली.
औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. तसेच समर्थांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, असं वक्तव्य केलं, यावरुन महाविकास आघाडी सरकार राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे.
आज विधीमंडळाच्या सभागृहाला मार्गदर्शन न करता राज्यपाल निघून गेले, तसेच राष्ट्रगीतही पूर्ण न करता राज्यपाल येथून निघून गेले, हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी राज्यपालांचा निषेध करतेय, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
इतर बातम्या-