Raj Thackeray : राज ठाकरेंवर कोणते गुन्हे दाखल; किती अटींचा केला भंग; वाचा पोलीस काय म्हणातात

12 अटी राज ठाकरे यांनी मोडल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच राज्यभर मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर कोणते गुन्हे दाखल; किती अटींचा केला भंग; वाचा पोलीस काय म्हणातात
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:45 PM

औरंगाबाद : रविवारी औरंगाबादेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा मशीदीवरील भोंगे आणि इतर विविध मुद्दांवरून रान उठवलं होतं. त्यात राज ठाकरेंच्या टार्गेटवर शरद पवारही (Sharad Pawar) होते. पवारांनी जातीय राजकारण पसरवलं, तसेच मशीदीवरील भोंगे हे ईदनंतर उतरलेच पाहिजेत, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असा इशारा राज ठाकरे यांनी दिली. मात्र राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी (Aurangabad Police) 16 अटी घालून दिल्या होत्या, त्यातल्या 12 अटी राज ठाकरे यांनी मोडल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच राज्यभर मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अटकेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर पोलीस हे राज ठाकरेंना नोटीस बजावण्या करीता त्यांच्या घरी जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

कोणती कलमं आणि काय कारवाईची शक्यता?

राज ठाकरेंवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा 153 आणि इतर कलमांखाली दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा अजामीनपात्र असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दाखल गुनहे चे विवरण, पोलीस स्टेशन – सिटीचौक, पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे नेमणुक सिटी पोलीस स्टेशन यांना फिर्यादी बनवण्यात आले आहे. तर गुन्हे-127/2022 कलम 116,117,153 भादवि 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017, अशा कलमाखाली गुन्हे दाखल करण्या आले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

तर यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात,आमच्यावरही झालेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात. राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्यांची ताकद नाही,असे लोक करतायत. शेवटी सुपारीचे राजकारण आहे. पण या सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत,कारण मुख्यमंत्र्यांचे याकडं लक्ष आहे. तसेच अल्टीमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा, नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील ,तर ती सर्वात मोठी चूक ठरेल व स्वत: एक्सोपज होतील. तसेच राज्याच्या पोलिसांची पाऊले योग्य दिशेने पडतायत, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.