लेणी पाहण्यासाठी मामा-भाचे आले, सप्तकुंड धबधब्यात तरुण पडल्यानंतर असा सुरू झाला थरार

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनासाठी गेलेल्या सतावीस वर्षीच तरुणांचा पाय घसल्याने सप्तकुंड धबधब्यात पडला. या ठिकाणी असलेल्या अनिल रावळ्कर याच्या लक्षात आल्यावर अजिंठा लेणीतील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना संपर्क केला.

लेणी पाहण्यासाठी मामा-भाचे आले, सप्तकुंड धबधब्यात तरुण पडल्यानंतर असा सुरू झाला थरार
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 11:31 PM

औरंगाबाद : पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक चांगली ठिकाणं शोधत आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पावसाचा आनंद घेण्याचा विचार करत आहेत. धोका लक्षात घेता प्रशासनाने काही ठिकाणी पर्यटनावर बंदी आणली. त्यालाही पर्यटक जुमानताना दिसत नाही. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनासाठी गेलेल्या सतावीस वर्षीच तरुणांचा पाय घसल्याने सप्तकुंड धबधब्यात पडला. या ठिकाणी असलेल्या अनिल रावळ्कर याच्या लक्षात आल्यावर अजिंठा लेणीतील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना संपर्क केला. तात्काळ शर्यतीचे प्रयत्न करून तरुणांला वाचवण्यात यश आले.

सप्तकुंड धबधबा धो धो कोसळतो

अजिंठा लेणी परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. सप्तकुंड धबधबा धो धो कोसळत आहे. आजही पाऊस सुरू असल्याने निसर्गरम्य वातावरण आणि लेणी पाहण्यासाठी सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथील मामा आणि भाचे लेणीत आले होते.

सेल्फीच्या नादात पडला सप्तकुंडात

दुपारी २ वाजताच्या सुमारास गोपाल पुंडलीक चव्हाण आणि त्याचा भाचा लेणीच्या वरील सप्तकुंड धबधबा पाहण्यासाठी गेले होते. तेवढ्यात सेल्फीच्या नादात त्याचा पाय घसरल्यामुळे तो सप्तकुंडात पडला.

सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्र अवतार

नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्र अवतार पाहायला मिळतोय. शेकडो फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी आज प्रचंड गर्दी केली. रविवारच्या सुट्टीमुळे दिवसभर सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसलय. धबधब्याचे अक्राळविक्राळ रूप नजरेत साठवण्यासाठी पर्यटकांनी इथे गर्दी केली.

चिपळूणमधील सवतसडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

रविवारी सुटी असल्याने चिपळूणमधील सवतसडा धबधब्यावर दुपारनंतर पर्यटकांची गर्दी सुरू झाली. चिमुकल्यांसह पर्यटकांनी धबधब्याच्या पाण्यात मौज मस्ती केली. रविवारी सुटी असल्यामुळे पर्यटन बहरले.

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.