PHOTO | युक्रेन, हंगेरी, बुडापेस्टमधून अखेर विद्यार्थी औरंगाबादेत, 8 दिवस अखंड प्रवास, आई-बाबांच्या जीवात जीव

गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये निशा इंदुरे, श्रुतिका चव्हाण, भूमिका शार्दूल, निष्कर्ष सानप, यश करमरकर, पीयूष करमरकर, अजिंक्य जाधव हे विद्यार्थी परतले. युक्रेनमधून बाहेर पडताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन निघालो, कशी बशी संकटांवर मात करत मायभूमी गाठली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

PHOTO | युक्रेन, हंगेरी, बुडापेस्टमधून अखेर विद्यार्थी औरंगाबादेत, 8 दिवस अखंड प्रवास, आई-बाबांच्या जीवात जीव
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:28 AM

औरंगाबादः रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine war) सुरु असलेल्या युद्धस्थितीमुळे हजारो नागरिकांचे प्राण जात आहेत. युद्धाचा आजचा नववा दिवस आहे. रशिया आणि युक्रेन देशांदरम्यान शांततेबाबत चर्चाही सुरु आहेत, मात्र रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russian Attack) अद्याप थांबलेले नाहीत. अशा स्थितीत विविध देशांचे जे नागरिक तेथे अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही परत आणण्यासाठी केंद्र सरकार मोठी मोहीम राबवत आहे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून नुकतेच मराठवाड्यातून युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणलं गेलंय. काल गुरुवारी रात्री औरंगाबाद विमानतळावर दिल्लीहून या विद्यार्थ्यांचं आगमन झालं. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या मुलांमध्ये औरंगाबादमधील बिडकीन येथील फारोळ्याचा रहिवासी अजिंक्य नंदकिशोर जाधव हादेखील आहे. अजिंक्यने टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना मागील आठ दिवसांच्या अखंड प्रवासाचा अनुभव उलगडला.

मुलाला पाहिलं अन् जीवात जीव आला..

गुरुवारी रात्री औरंगाबाद विमानतळावर अजिंक्यसोबत मराठवाड्यातील इतर सहा ते सात जणांचं आगमन झालं. डॉक्टरकीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेल्या मुलावर संकट कोसळल्याने इकडे भारतातल्या पालकांचा जीव टांगणीला लागला होता. भारतीय दूतावासाकडून मुलांना युक्रेनमधून सोडवण्याचे प्रयत्न सुरु होते. मुलांचे फोनही सुरु होते, पण त्याला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्यानंतर आई-बापाच्या जीवात जीव आला.

Ukraine Returned Student

8 दिवसांचा अखंड प्रवास

युक्रेनमधून फारोळ्यात पोहोचलेल्या अजिंक्यनं मागील आठ दिवसांचा प्रवास उलगडून सांगितला. 27 फेब्रुवारीला सकाळी साडे चार वाजता युक्रेनमधून 500 ते 600 भारतीय विद्यार्थी हंगेरी बॉर्डरपर्यंत पोहोचले. यासाठी भारतीय दूतावासानं बस पुरवल्या होत्या. हंगेरीत प्रचंड गर्दी होती. ही बॉर्डर पार करायलाच 24 तास लागले. तोपर्यंत मुलं भुकेने व्याकुळ झालं होती. तिथं नायजेरीया, टर्की आदी देशांचेही मुलं होतं. हंगेरीत तीन चेक पॉइंट होते. अखेर हंगेरीतल्या भारतीय दूतावासात पोहोचल्यानंतर जेवायला मिळालं. त्यानंतरन व्हिसा करण्यात दोन दिवस गेले. त्यानंतर बुडापेस्टला पोहोचले. बुडापेस्टमधून निघालेलं विमान गुरुवारी दिल्लीत पोहोचलं. गुरुवारी संध्याकाळी औरंगाबादेत पोहोचल्याचं अजिंक्यने सांगितलं. युक्रेनमधील संकटामुळे पुढे काय होईल, अशी भीती होती. अखेर केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नानंतर हे विद्यार्थी सुखरूप परतल्यामुळे पालकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबत नाहीयेत..

Ukraine Returned Student

अजिंक्य सेकंड ईयरला होता

युक्रेनमधून औरंगाबादेत परतलेला अजिंक्य जाधव MBBS च्या सेकंड इयरला होता. त्याला एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहे. वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. युक्रेनमधील उजग्रोथ नॅशनल युनिव्हर्सिटीत अजिंक्य शिकत होता. आता भारतात परतल्यानंतर सध्या तरी कुटुंबियांसोबत अत्यंत सुरक्षित असल्याची भावना अजिंक्यने व्यक्त केली.

Ukraine Returned Student

औरंगाबादचे सहा आणि बुलडाण्याचा एक विद्यार्थी परतला

गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये निशा इंदुरे, श्रुतिका चव्हाण, भूमिका शार्दूल, निष्कर्ष सानप, यश करमरकर, पीयूष करमरकर, अजिंक्य जाधव हे विद्यार्थी परतले. युक्रेनमधून बाहेर पडताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन निघालो, कशी बशी संकटांवर मात करत मायभूमी गाठली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

इतर बातम्या-

ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.