“…यांनी पाठीवर दिलेला घाव बघा”; रॅप साँग करणाऱ्या तरुणाला झाली अटक, राष्ट्रवादीच्या नेत्याने ट्विट करून नेमकं ते सांगितलं..

| Updated on: Apr 06, 2023 | 6:20 PM

आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठीशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. अशा शब्दात त्यांनी त्यांनी पोलिसांचा समाचार घेतला आहे.

...यांनी पाठीवर दिलेला घाव बघा; रॅप साँग करणाऱ्या तरुणाला झाली अटक, राष्ट्रवादीच्या नेत्याने ट्विट करून नेमकं ते सांगितलं..
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : पन्नास खोके घेऊन किती चोर आले, कसे ओके होऊन चोर आले अशा उडत्या चालीत रॅप साँग करून सोशल मीडियावर धूमाकूळ घालणाऱ्या नवोदित कलाकाराला शिंदे गटाने त्याच्या कलेवरच घाव घातला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आले. महाविकास आघाडीतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार केले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मात्र हे सरकार अस्तित्वात आल्यापासून शिंदे गटावर 50 खोके एकमद ओके अशा त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आल्या आहेत.

तर अजूनही त्याच प्रकारची टीका सत्ताधारी शिंदे गटावर केली जाते. तर त्याच प्रमाणे सोशल मीडियावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जसे समर्थन मिळते आहे तसेच त्यांच्यावर जोरदार टीकाही केली जाते. तर सध्या सोशल मीडियावर एक रॅल साँगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

त्या व्हिडीओमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे आणि व्यक्तीचे नाव नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील राम मुंगासे या नवोदित कलाकाराने केलेल्या रॅप साँगमुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ते रॅप साँग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

राम मुंगासे याच्या रॅप साँगमध्ये राजकीय टीका टिप्पणी केली असली तरी त्यामध्ये कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव घेण्यात आले नाही.

त्यामुळे राजकीय वातावरण आता तापले असून राष्ट्रवादीने राम मुंगासेच्या अटकेवर राजकारणावर आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राम मुंगासे या कलाकाराच्या अटकेमुळे आता आणि पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.पोलिसांनी त्याला अटक करण्यात आल्याने विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासे याचा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले आहे.

नवोदित कलाकाराल अटक करण्यात आल्याने आता त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

त्यानंतर आता ते त्याला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देतील असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.मात्र त्याचा गुन्हा काय असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे. त्याने तर कोणाचे नावदेखील घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं.

50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं आहे असा सवाल त्यांनी सरकार आणि प्रशासनाला विचारला आहे.

त्यामुळे आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठीशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. अशा शब्दात त्यांनी त्यांनी पोलिसांचा समाचार घेतला आहे.