मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये घेतो, माझी जबाबदारी आहे : संभाजीराजे छत्रपती
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर इतर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
औरंगाबाद : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर इतर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. “मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो. त्यामुळे या प्रकरणात माझी जबाबदारी आहे. जशी माझी जबाबदारी आहे तशीच सगळ्या खासदारांचीही आहे,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं. तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधींनी देखील ही जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन केलं (Sambhajiraje Chhatrapati comment on Maratha reservation and responsibility of all MP).
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “समाजाला वेठीस धरू नये ही आमची भूमिका आहे आणि ती रास्त आहे. मूक आंदोलन आम्ही थांबवलेत, बंद केलेले नाहीत. मी तुमच्या पैशातून महिन्याला 2 लाख रुपये पगार घेतो, मग माझी जबाबदारी नाही का? जशी माझी जबाबदारी तशी सगळ्याच लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे. इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
“मॅनेज होणं छत्रपतींच्या रक्तात नाही”
“कुठल्या लेव्हलला तह करायचा हे छत्रपतींच्या रक्तात नाही. कुणाल वाटलं मी मॅनेज झालो. अहो मी छत्रपती शिवाजी आणि शाहूंच्या घरात माझा जन्म झालाय. मॅनेज होणं माझ्या रक्तात नाही. केंद्राने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी. केंद्राने मागासवर्गीय आयोग नेमून समाजाला न्याय द्यावा. आरक्षण मिळेल अथवा न मिळेल तोपर्यंत सारथी घेऊ ना आपण. दरवेळी परवानगीसाठी अजित पवारांकडे का जायचं? त्यासाठी सारथीला स्वायत्तता मिळवली. सारथीचं बजेट 500 कोटींच्या खाली नसलं पाहिजे,” असं संभाजीराजेंनी सांगितलं.
“औरंगाबादला पण सारथीचं उपकेंद्र सुरू झालं पाहिजे”
“सारथीचं विभागीय उपकेंद्र पाहिलं. 5 दिवसात तिथे उद्घाटन केलं. औरंगाबादला पण उपकेंद्र सुरू झालं पाहिजे. मी सुद्धा वेरुळचा, मराठवाड्यातला आहे. शिवाजी महाराजांचे वडील वेरुळचे होते. त्यामुळे पहिला मान मराठवाड्याला,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
जे संभाजी छत्रपतींच्या पोटात तेच ओठावर आलंय का? मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा समजून घ्या 10 पॉईंट्समधून
“संभाजीराजे मनात आणलं असतं तर काहीही करू शकले असते, पण…” : उद्धव ठाकरे
नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, जमीनही मिळाली, ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक : संभाजीराजे
व्हिडीओ पाहा :
Sambhajiraje Chhatrapati comment on Maratha reservation and responsibility of all MP