‘न्यायालयाने जल्लादाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांना दिलीय’, संजय राऊत भाषणात काय म्हणून गेले?

खासदार संजय राऊत यांनी आज औरंगबादमध्ये चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी आपल्या भाषणात शिवसेवा आणि भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तुलना थेट जल्लादाशी केली.

'न्यायालयाने जल्लादाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांना दिलीय', संजय राऊत भाषणात काय म्हणून गेले?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 4:59 PM

औरंगाबाद : “सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलेलं आहे. अडाणी माणूस जेलमध्ये जातो. पण बाहेर येताना बॅरिस्टर होऊन येतो. न्यायालय फाशीची शिक्षा सुनावते. पण फाशी द्यायला जल्लाद आणावा लागतो. न्यायायाने यावेळी जल्लादाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षावर दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना ही जबाबदारी आणि हा निकाल द्यावाच लागेल”, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. तसेच “विधासभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र करावंच लागेल. कायदा आणि व्यवस्था भ्रष्ट होईल पण संविधान भ्रष्ट होणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाचे खासदार संजयल राऊत आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली.

रिकाम्या खुर्च्यांवर संजय राऊतांकडून नाराजी व्यक्त

“भाषण कधी थांबवायचं, हे ज्याला कळतं तो नेता आणि जो बोलत राहतो तो भाषण माफिया असतो”, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्याचबरोबर इतिहासाबरोबर भूगोलाचा अभ्यास केला पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. “औरंगाबादला अनेक कार्यक्रम झाले. पण समोरची गॅलरी कधी रिकामी दिसत नव्हती. आपल्या सर्वांनी त्यांनी याचा विचार करायला पाहिजे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी रिकाम्या खुर्च्यांवर नाराजीदेखील व्यक्त केली.

“शंभर गद्दार निघून जातात आणि एखादा उदयसिंग राजपूत टिकून राहतो, त्यामुळे शिवसेना जीवंत आहे. एक शिवसेना आहे, दुसरी शिवसेना निर्माण होऊ शकत नाही. जे लोक सोडून गेले ते कसली शिवसेना निर्माण करणार?”, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“कोण एकनाथ शिंदे? जे सोडून गेले ते परत निवडून येणार नाहीत हा आपला इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोडून जाणारे पुन्हा राजकारणात आणि समाजकारणात दिसले नाहीत”, असं राऊत म्हणाले.

‘थुंकण्याची क्रिया बाळासाहेबांकडून घेतली’

“थुंकण्याची क्रिया बाळासाहेबांकडून घेतली आहे. एकदा बाळासाहेबांच्या दातांचं ऑपरेशन सुरू होतं. त्यावेळेला रजनी पटेल यांचा निरोप घेऊन दत्ताजी आले होते. त्यावेळेला थुंकी आणि रक्ताच्या पाणीसह ते बेसिंगमध्ये थुंकले होते. त्या काळापासूनच मी थुंकण्याची प्रेरणा घेतली”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी आपल्या भाषणात दिलं.

‘आधी तुमचा बाप कोण? हे सांगा’

“शिवसेना आमची म्हणता, अरे आधी तुमचा बाप कोण? हे सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेता. मग ते तुमचे बाप आहेत ते स्वीकारा”, असा घणाघात संजय राऊतांनी केला. तसेच “माझा आवाज पोचतो रे दिल्लीपर्यंत. गेला असेल माझा आवाज”, असं संजय राऊत कार्यकर्त्यांना उद्ददेशून यावेळी म्हणाले.

“मंत्री दादा भुसे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात ठेवणे परवडणारे नाही. नाहीतर लोक रस्त्यावर जोड्याने मारतील”, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.

‘औरंगजेबाला जीवंत का करताय?’

“औरंगजेबाची कबर इथे आहे आणि जीवंत करतायत कोल्हापुरात. जीवंत का करताय? कारण तुम्हाला राजकारणासाठी जीवंत करायचाय. कर्नाटकात बजरंगबली यांच्या कामाला आला नाही. मोदी गदा घेऊन फिरले. पण ती गदा जनतेने त्यांच्याच डोक्यात घातली. आता हे औरंगजेब बाहेर काढत आहेत”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

“सत्तार हिंदुत्ववाचे प्रचारक आहेत. काही दिवसांनी संघाचे प्रचारक बनतील. हाप चड्डी घालतील. फुल पॅन्ट आली आता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फौजदाराचा शिपाई केला”, असे टोले राऊतांनी लगावले.

“औरंग्याच्या औलाद तुम्हीच तयार केला. तुम्हीच दंगली घडवताय, कोल्हापुरात सर्व लोक बाहेरून आणले होते. 90 टक्के लोक दंगलीसाठी बाहेरून आणले होते”, असा दावा संजय राऊतांनी केला.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....