शरद पवार यांची खेळी समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल; संजय शिरसाट यांचं मोठं आणि सूचक विधान

राष्ट्रवादीतील नेत्यांनी मोठी विधानं करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी फुटली की नाही? फुटली नसेल तर अजितदादा भाजपसोबत कसे? असा सवाल केला जात आहे.

शरद पवार यांची खेळी समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल; संजय शिरसाट यांचं मोठं आणि सूचक विधान
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 2:16 PM

औरंगाबाद | 26 ऑगस्ट 2023 : सध्या राष्ट्रवादीमधील घडामोडींमुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या बाबत काही विधाने केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पडद्यामागचा गेम काय सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांची खेळी समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल असं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या सूचक विधानमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असेही म्हणतात आणि तिकडे गनिमी कावा असेही म्हणतात. ही संजय राऊत यांची भूमिका गांडूळासारखी आहे. राष्ट्रवादीचा एक गट युतीमध्ये आल्यानंतर ही फूट झालेलीच आहे. त्याला छुपा पाठिंबा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा दिसतो असे संकेत आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाला राष्ट्रवादीत संभ्रमावस्था आहे असं वाटत आहे. पण संभ्रमावस्था लोकांमध्ये होत नाहीत तर त्यांच्या अंतर्गत गैरसमजाने होत आहे. शरद पवार इतक्या लवकर त्यांचे पत्ते ओपन करतील हे समजण्याचं कारण नाही. शरद पवार यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, असं संजय शिरसाट म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर शरद पवारांना पेढे खाऊ घालावे

संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत यांनी कालच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेलली आहे. ज्याप्रमाणे शरद पवार स्टेटमेंट बदलतात त्याचप्रमाणे संजय राऊतही स्टेटमेंट बदलतात. संजय राऊत यांना माहीत आहे की आता महाविकास आघाडीत फूट पडलेली आहे. हाविकास आघाडी राहणार नाही. संजय राऊत म्हणत असतील की शरद पवार हे गनिमीकाव्याने लढत आहेत तर त्यांनी शरद पवार यांना जाऊन पेढे खाऊ घालावे. शरद पवार यांच्या शौर्याची तारीफ केली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

तर त्यांनी बोलावं

राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाकडून पक्ष फुटल्याचं पत्र आलं नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नार्वेकर यांना राष्ट्रवादी फूटीबाबत पत्र मिळाले असेल तर, ज्यांनी पत्र दिले त्यांनी पत्राबाबत पुष्टी करावी, असं त्यांनी सांगितलं.

सभेतून काही निष्पन्न होणार नाही

उद्धव ठाकरे उद्या सभेनिमित्त बाहेर निघत आहेत चांगली गोष्ट आहे. सभेच्या माध्यमातून का होईना पण कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातो. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर निघत असेल तर ठीक आहे. परंतु या सभेमधून फार काही निष्पन्न होईल असे काही नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.