संतोष मर्डर प्रकरणी आरोपींना मोक्का लागणार? 30 दिवस पोलिसांनी काय केलं?; कोर्टात जोरदार युक्तिवाद

वाल्मिक कराड फरार होताना आणि शरण येताना वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे, अशी माहिती सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. सुदर्शन घुले आणि विष्णु चाटे यांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारी वकिलांनी विष्णू चाटेच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

संतोष मर्डर प्रकरणी आरोपींना मोक्का लागणार? 30 दिवस पोलिसांनी काय केलं?; कोर्टात जोरदार युक्तिवाद
Santosh Deshmukh Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 4:16 PM

संतोष देशमुख मर्डर प्रकरणावर कोर्टात जोरदार सुनावणी सुरू आहे. विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या चार आरोपींना न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. पावसकर यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं आहे. विष्णू चाटे आणि इतरांना सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. या प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. 30 दिवस पोलिसांनी काय केलं? पोलीस आरोपींना शो पीस म्हणून वापरत होते का? असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. तर आरोपींना जास्तीत जास्त कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. तसेच आरोपींना मोक्का लावता येतो का? याचा आम्ही अभ्यास करत असल्याचं डीवायएसपी अनिल गुजर यांनी सांगितलं आहे.

डीवायएसपी अनिल गुजर यांनी मोठी माहिती दिली आहे. संतोष देशमुख मर्डर केसमधील आरोपींना मोक्का लावण्यात येतो का याचा आम्ही अभ्यास करत आहतो. या प्रकरणात 51-52 कलम वाढवण्यात आलं आहे, असं सांगतानाच आम्हाला आरोपींची कोठडी वाढवून हवी आहे. कारण कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाही. त्याला कोणी मदत केली हे अटक करण्यात आलेले आरोपीच सांगू शकतात. त्यामुळेच आम्हाला कस्टडी वाढवून हवी आहे, असंही अनिल गुजर यांनी सांगितलं.

दबावाखाली काम

आरोपीचे वकील ए. व्ही. तिडके यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे. तपास अधिकाऱ्याकडे कोठडी मागण्याची वेगळी कोणतीही कारणे नाहीत. तपास पूर्ण झाला आहे, अशी परिस्थिती आहे. तपास अधिकारी सामाजिक आणि राजकीय दबावाखाली काम करत आहेत. आरोपींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार व्हायला हवा. आरोपींची कोठडी मागण्यासाठी काहीही एक नवीन कारण नाही. त्यामुळेच आरोपींना कोठडी देण्यात येऊ नये, अशी मागणी ए. व्ही. तिडके यांनी केली.

आता वेगळा काय तपास करणार?

या 30 दिवसात पोलिसानी काय केलं? आरोपींना काय शो पीस म्हणून वापरल का? अजून कसला तपास करायचा आहे? आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यार जप्त झालेली आहेत. अजून काय वेगळा तपास करायचा आहे? असा सवाल करतानाच तिडके यांनीअर्नेश कुमार केसचा दाखलाही दिला.

कट रचून हत्या नाहीच

तपासासाठी आरोपींना देण्यात आलेली पोलीस कोठडी पुरेशी आहे. मागील गुन्ह्यांचा संदर्भ हा आरोपींच्या कोठडी मागण्याचं कारण असू शकत नाही. फक्त सीडीआरचा संदर्भ घेऊन आरोपींनी कट रचला असे म्हणता येणार नाही. हे सगळं कट रचून झालेल नाही हे सगळं एकच दिवसात घडलेलं आहे. आरोपींनी कट रचून संतोष देशमुखांची हत्या केली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

राजकीय दबावापोटी गुन्हा

दरम्यान, विष्णू चाटे या संशयित आरोपीच्या वकिलानेही यावेळी युक्तिवाद केला. फक्त एका नव्या आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला म्हणजे पोलीस लगेचच आरोपींची कोठडी वाढवून मागू शकत नाहीत. सिद्धार्थ सोनवणे याच्या अटकेनंतर नव्या आरोपींच्या सहभागाची शक्यता सीआयडीने कोर्टात व्यक्त केली आणि कोठडी वाढवून मागण्याच कारण सांगितल. 9 तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा तो गुन्हा दाखल झाला. 11 तारखेला 29 तारखेला झालेल्या घटनेवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यावर फक्त राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टात केला.

साधी एनसीही नाही

आरोपी विष्णू चाटेला दोन वेळा पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे. आता पुन्हा पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही. विष्णू चाटेवर याआधी एक साधी एनसी पण दाखल नाही. पण आता राजकीय दबावापोटी हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जितकी पोलीस कोठडी विष्णू चाटेला मिळाली ती पुरेशी आहे. आता पुन्हा कोठडी देण्यात येऊ नये, अशी मागणीही चाटेच्या वकिलाने केली.

समोरासमोर बसवून चौकशी करायचीय

यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनीही जोरदार युक्तिवाद केला. तपास अधिकारी उगाच पोलीस कोठडी वाढवून मागत आहेत, असा समज करून घेणे चुकीचं आहे. तपासदरम्यान ज्या बाबी निष्पन्न होतायत, नव्या आरोपींची अटक आणि सहभाग निष्पन्न होतोय त्यानुसार तपास अधिकारी पोलीस कोठडी वाढवून मागत आहेत हे लक्षात घ्यायला हवं. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. परवा अटक करण्यात आलेले तीन आरोपी आणि कोठडीत हवे असलेले आरोपी यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे, असं बाळासाहेब कोल्हे म्हणाले.

म्हणजे कोठडीचे कारण संपले नाही

डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नीची आम्ही चौकशी करत आहोत. कालदेखील त्यांची चौकशी करून नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलेल आहे. नेमका हा कट कसा रचला गेला? काय नेमकं घडलं होतं या शक्य गोष्टींचा उलगडा होणे गरजचे आहे त्यासाठी आम्हाला पोलीस कोठडी हवी आहे. एखाद्या गुन्ह्यात रिकव्हरी झाली म्हणजे पोलीस कोठडीचे कारण संपले असे म्हणता येत नाही. तपास महत्त्वाचा आहे. कृष्णा आंधळेला अटक करणे अद्याप बाकी आहे. तो फरार आहे. तपास करायचा आहे. आम्हला आरोपींची पोलीस कोठडी हवी आहे. आमच्या मागणीचा कोर्टाने विचार करावा, असं सरकारी वकील कोल्हे म्हणाले.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.