शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात ? जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली

जळगाव जिल्ह्यातील आमदार लताबाई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचा दावा जात पडताळणी समितीने फेटाळला होता. या निर्णयाला आव्हान देणारी त्यांची याचिका आज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. हा आ. सोनवणे यांना मोठा धक्का मानण्यात येत आहे.

शिवसेनेच्या आमदार लताबाई  सोनवणे यांची आमदारकी धोक्यात ?  जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाने  फेटाळली
आ. लता सोनवणे
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:43 PM

औरंगाबादःजळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या (Chopada constituency ) शिवसेनेच्या आमदार (Sena MLA) लताबाई चंद्रकांत सोनवणे (Latabai Sonowane) यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. समितीविरोधात त्यांनी शड्डू ठोकले होते. या निर्णयाविरोधात कायदेशीर आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) आव्हान याचिका दाखल केली होती. याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता, न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांच्या खंडपीठाने पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला आणि आव्हान याचिका फेटाळली. त्यामुळे आमदार सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चोपडा मतदार संघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी(SC) राखीव ठेवण्यात आला होता. आ. सोनवणे या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे जगदीशचंद्र वळवी यांनी निवडणूक लढवली होती. वळवी यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी सातत्याने सोनवणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता.

प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी लढाई

लताबाई सोनवणे यांनी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवली. टोकरे कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. त्या निवडून आल्या. राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविल्याने त्यांनी जातीचा दावा पक्का करण्यासाठी आणि जात प्रमाणपत्र वैधतेसाठी नंदुरबार येथील अनुसूचित जाती पडताळणी समितीकडे प्रकरण दाखल केले होते. समितीकडे झालेल्या सुनावणीत पराभूत उमेदवार वळवी यांनी सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला आक्षेप घेतला आणि सोनवणे या अनुसूचित जात प्रवर्गातील नसल्याने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती त्यांनी केली. नंदुरबार येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वारंवार संधी देऊनही टोकरे कोळी जातीचा दावा सिद्ध करण्यात सोनवणे यांना अपयश आले होते. दक्षता पथकाच्या अहवालाआधारे पडताळणी समितीने सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र या वर्षी 9 फेब्रुवारी रोजी अवैध ठरवले होते. या निर्णयाला सोनवणे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

हे सुद्धा वाचा

टोकरे कोळीचा दावा सिद्ध करण्यास असमर्थ

दरम्यान वळवी यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. डी. सपकाळ आणि अॅड. योगेश बी. बोलकर यांनी बाजू मांडली. आमदार सोनवणे यांचे वडील, आजोबा, काका यांच्या सर्व नोंदी या कोळी अथवा सूर्यवंशी कोळी जातीच्या असल्याचा दावा करत त्या टोकरे कोळी जातीचा दावा सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याचा दावा त्यांनी केला. दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंतर सदर याचिका निकालासाठी राखीव ठेवण्यात आली होती. आज खंडपीठाने सदर याचिका फेटाळण्याचा आणि पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवण्याचा निकाल दिला.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.