“बाबरी पाडताना त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर,झेंडा नव्हता”; शिवसेनेच्या आमदाराने चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले

तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका म्हणाले होते तरीही तुम्ही तिथे गेला आहात.त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

बाबरी पाडताना त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर,झेंडा नव्हता; शिवसेनेच्या आमदाराने चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 4:53 PM

छत्रपती संभाजीनगर : बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते, आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत. तर त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाठ यांनी केले आहे. त्यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक आहे. त्यामुळे कुणाच्या बाजूने आहे असे मला वाटत नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आमदार संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत पाटील यांचे समर्थन करताना म्हणाले की, राम मंदिर उभारणी किंवा बाबरी पाडणे हे आंदोलन सर्व हिंदू धर्मियांचे होते.

त्या ठिकाणी कोण्या पक्षाचे बॅनर किंवा झेंडा नव्हता असे म्हणते शिवसेनेच्याच आमदाराने भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या सूरात सूर मिसळले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीच्या विषयावरून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यामुळे आता शिवसेना, भाजप आणि ठाकरे गट यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला त्यावेळेस शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी ढाचा पाडला असेल तर मला त्याचा अभिमान आहे या बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचीही आठवण करून दिली जात आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

बाबरी ढाचा पाडला त्या आंदोलनाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला होता. आज जे बोलत आहेत की बाळासाहेबांचा अपमान झाला आहे.

बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिम्मत या देशांमध्ये कोणाचेही नाही अशा शब्दात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचेही त्यांनी समर्थन केले आहे.

यावेळी संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबो केला आहे. त्यांनी वक्तव्य केले होते की तुम्ही त्यांची नाडी धरून गेले होता का..? त्यावर शिरसाठ यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

तुमची नाडी आता शरद पवार यांनी काढली आहे, त्यामुळे तुमची अवस्था आता विनाड्याच्या पायजमासारखी झाली असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. तुम्ही शिवसेनाप्रमुखाच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आहात.

त्यामुळे आता टाळ्या वाजवत बसा, मात्रा आता तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. आज जे बोलत आहेत मात्र त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये कोणीच नव्हते त्यांना राम जन्मभूमी आणि कार सेवकांची माहिती सुद्धा नाही.

आम्ही दर्शनाला गेलो तरी तुमच्या पोटात दुखते आज आदित्य ठाकरे काय हैदराबादच्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला गेला काय अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

तुम्हाला शरम वाटली पाहिजे ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाऊ नका म्हणाले होते तरीही तुम्ही तिथे गेला आहात.त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी आणि गुन्हेगार तुम्ही आहात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.