हर्षवर्धन जाधवांच्या राजकारणाचा अस्त तर संजना जाधवांचा उदय? पिशोर ग्रामपंचायतीचा सविस्तर रिपोर्ट

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये मात्र एक वेगळीच रंजक चित्र पाहायला मिळतंय.

हर्षवर्धन जाधवांच्या राजकारणाचा अस्त तर संजना जाधवांचा उदय? पिशोर ग्रामपंचायतीचा सविस्तर रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:09 PM

औरंगाबाद : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये मात्र एक वेगळीच रंजक चित्र पाहायला मिळतंय. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वत:च एक पॅनल उभा केला आहे तर दुसर्‍या बाजूला हर्षवर्धन जाधव यांना मात्र उमेदवारच न मिळाल्यामुळे स्वतःचे पॅनेलने उभा करता आला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या राजकारणातून हर्षवर्धन जाधव बाद झाल्याचे चित्र आहे (Special report on Pishor Grampanchayat Election and Harshvardhan Jadhav and Sanjana Jadhav political fight).

हर्षवर्धन जाधव- संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांचे नातेसंबंध एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई तर संजना जाधव यांचे पती आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवेवर बेछूट आरोप केलेले आहेत. त्यामुळे सासरे जावई यांच्यातला वाद सर्वदूर पोहोचला आहे. त्यात आता कन्नडचे राजकारण आणखी एक घडामोड घडते ती अशी की आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना स्वतःच्या गावात पिशोर ग्रामपंचायतीमध्ये खातं उघड करता आलं नाही. तर त्यांची पत्नी संजना जाधव यांनी मात्र पिशोर ग्रामपंचायतीमध्ये नवऱ्याला बाजूला सारत स्वतः पॅनल उभा केला आहे. त्यामुळे पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळी रंजकता निर्माण झालीय.

पिशोर ग्रामपंचायत औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग आहेत तर सतरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे . महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायतीवर ज्यांचे वर्चस्व असेल त्यांचंच तालुक्यावर वजन असते. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून हर्षवर्धन जाधव यांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवली होती.

विश्वासू सहकाऱ्याला सोबत घेऊन संजना जाधव यांचा निवडणुकीत स्वतःचा पॅनल

नारायण मोकाशी नावाचे सरपंचही हर्षवर्धन जाधव यांच्या वतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालवायचे मात्र नारायण मोकाशी यांच्या वरतीच काही दिवसापूर्वी अविश्वासाचा ठराव आला. त्यामुळे नारायण मोकाशी आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. परिणामी हर्षवर्धन जाधव यांच्या हातातून पिशोर ग्रामपंचायत गेली. यावेळेला नारायण मोकाशी यांनी स्वतःचा सवतासुभा मांडला आहे तर हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारही मिळाला नाहीच मात्र दुसर्‍या बाजूला बाळासाहेब जाधव नावाच्या एका विश्वासू सहकाऱ्याला सोबत घेऊन संजना जाधव यांनी निवडणुकीमध्ये आपला पॅनल उभा केला आहे.

‘संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव यांना काडीमोड देण्याचा निर्णय’

हर्षवर्धन जाधव यांची अनेक प्रकरणं आतापर्यंत बाहेर आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव अडकले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक सुद्धा पराभूत झालेली आहेत. त्यासोबतच पुण्यात एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना नुकतीच अटक सुद्धा झालेली आहे. संजना जाधव यांना काडीमोड देण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे जाधव आणि दानवे कुटुंबाचे संबंध टोकाचे ताणले गेलेत. त्यामुळे सुद्धा हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत.

…तर संजना जाधव यांचं कन्नड तालुक्यातील विधानसभेचा मार्ग मोकळा होणार

हर्षवर्धन जाधव समस्यांच्या गर्तेत अडकत असताना दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला किंवा कन्नड तालुक्याला नेता हवा असतो. त्यामुळे अनेक जण रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्याकडे नेता म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळेच संजना जाधव यांचे सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्त्व अनन्यसाधारण आहे. संजना जाधव जर या निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्या आणि पिशोर ग्रामपंचायती वरती त्यांचा सरपंच बसला तर संजना जाधव यांचं कन्नड तालुक्यातील विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहेत.

हेही वाचा :

आंदोलन प्रहारचं पण सासऱ्यांविरोधात जावई टाकीवर!

श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

मला वेडे ठरवणारे दानवे-खैरे दसपट वेडे, घर-दार, संपत्ती घ्या पण जगू द्या, हर्षवर्धन जाधवांचा नवा व्हिडीओ

Special report on Pishor Grampanchayat Election and Harshvardhan Jadhav and Sanjana Jadhav political fight

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.