HSC, SSC Exams | दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका, सुनावणी कधी?

बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत, असे याआधीच शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात औरंगाबादच्या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली आहे.

HSC, SSC Exams | दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका, सुनावणी कधी?
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 2:19 PM

औरंगाबाद | येत्या मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या (SSC, HSC Exams) नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High court Bench) दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात (Covid-19) विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थी तणावात आहेत. अशात शाळाही अनियमित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही, यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आले आहे, असे कारण या याचिकेत देण्यात आले आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका त्याने कोर्टात दाखल केली आहे.

ऑनलाइन घ्या किंवा पुढे ढकला- याचिका

कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच 4 फेब्रुवारी रोजीच्या परीक्षेसंबंधीच्या अधीसूचनेला स्थगिती द्यावी आणि ती रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी अॅड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.

काय आहे परीक्षेचे वेळापत्रक?

बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहेत.

इतर बातम्या-

Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.