अब्दुल सत्तार तुमच्या टिकेमुळे सुप्रियाताईंना काय फरक पडत नाही, सुषमा अंधारेंनी सरळ लायकीच काढली…
शिंदे-फडणवीस सरकारमधील अब्दुल सत्तार हे सध्या कृषी मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
औरंगाबादः ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आजच्या महाप्रबोधन यात्रेत सुरुवात झाल्यानंतर पहिली तोफ शिंदे सरकारमधील वादग्रस्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरच डागण्यात आली. यावेळी सुषमा अंधारे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अब्दुल सत्तार हे आधी काँग्रेसचे होते आता ते शिवसेनेचे झाले आहेत. पक्ष बदलावरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. शिंदे-फडणवीस सरकारमधील अब्दुल सत्तार हे सध्या कृषी मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तु्म्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. पण त्याचा कोणताही फरक सुप्रिया सुळे यांच्यावर पडला नाही, पण लोकांनी तुमची लायकी काढली असा जोरदार हल्ला त्यांनी त्यांच्यावर चढवला.
सुषमा अंधारे यांनी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कधी कधी वाटतं देवेंद्र फडणवीस यांना ठरवून बोलायला सांगत असतील.
कारण जे लोक लोक आव्हांडवर केस दाखल करतात, तेच लोक सत्तार आणि गुलाबरावांना गुळगुळीत भाषेत समजावतात. यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीसांना हे कळत नाही का, तुम्ही पक्षाचे नाही राज्याचे गृहमंत्री आहात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील चाललेल्या गलिच्छ राजकारणावर जोरदार हल्लाबोल चढविला. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या भाषेचा त्यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला.