Amit Shah | ‘अमित शाह घाबरतात’, ठाकरे गटाच्या नेत्याच मोठं वक्तव्य, औरंगाबाद दौरा रद्द, VIDEO
Amit Shah | "मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणून अन्यथा आपण तिसऱ्या पाकिस्तानात असतो" असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्याने केलं. अमित शाह यांचा नियोजित औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे.
औरंगाबाद : उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होणार आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना बैठकीबद्दल विचारण्यात आलं. ते म्हणाले की, “मागच्यावेळेस केलेल्या घोषणा अजून पूर्ण झालेल्या नाहीत. मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिक, पाल्यांच आजही उपोषण चालू आहे. मी सुद्धा पाल्य आहे” “फक्त बैठका घेण्यासाठी ते आले आहेत. मराठवाड्यात मुक्तीसंग्राम का झाला? याकडे त्यांनी पाहिलं पाहिजे. तिथे दुर्लक्ष केलं. फक्त फाईव्ह स्टार हॉटेल बुक करुन, थांबायच काम सुरु झालय” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
अमित शाह औरंगाबादला येणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाला आहे, याबद्दल खैरे यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “अमित शाह येणार होते. पण ते आले नाहीत. त्यांच्या संपूर्ण दौऱ्याचा खर्च 4-5 कोटीचा आहे. प्रशासनाने हा खर्च केला. त्याची चौकशी पुढे कधी होईलच” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. “अमित शाह यांचं आम्ही स्वागत केलं असतं. मणिपूर तसच शहीद झालेल्यांबद्दल ते बोलतील असं आम्हाला वाटतं होतं. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे, त्या समस्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या असत्या” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. “शिवसेना काही करु शकते. आम्ही त्या संघर्षांना घाबरत नाही. बाळासाहेबांकडून बाळकडू मिळालं आहे” असं खैरे म्हणाले. “आम्ही नाही, अमित शाह घाबरतात” असं चंद्रकांत खैरे म्हणाले. ….अन्यथा आपण तिसऱ्या पाकिस्तानात असतो
खासदार इम्तियाज जलील ध्वजवंदनाला येणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, “ही भाजपची बी टीम आहे. आतमधून मिळालेली आहे. मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही” “मराठवाडा स्वतंत्र झाला म्हणून अन्यथा आपण तिसऱ्या पाकिस्तानात असतो” असं चंद्रकांत खैरे म्हणाले.