औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात, लवकरच निर्बंध हटणार, जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य शासनाला अहवाल

जिल्ह्यातील सुमारे 8 लाख नागरिकांचा अजूनही कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेमे बाकी आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी शहरात 70 खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून 70 वॉर्डांत लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात, लवकरच निर्बंध हटणार, जिल्हाधिकाऱ्यांचा राज्य शासनाला अहवाल
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 12:08 PM

औरंगाबादः राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील कोरोना (Aurangabad corona) रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी लोकांच्या उपस्थितीबाबत अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे शहर (Aurangabad city) तसेच ग्रामीण भागातील हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृहे तसेच लग्न सोहळ्यातील उपस्थितांच्या संख्येवरील सर्व निर्बंध हटवावेत, असा अहवाल जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. तसेच जिल्ह्यातील बैलगाडी शर्तींनाही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मागील महिन्यात खुलताबादच्या अर्जावर निर्णय झाला नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांसह बैलगाडी शर्यतींना आता परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती काय?

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे केवळ 10 रुग्ण आढळले. शहरात 8 तर ग्रामीण भागात 2 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 65 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोना रुग्णांचे प्रमाण मागील काही दिवसांपासून झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हळू हळू निर्बंध कमी केले जात आहेत. शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाळूज, जरंडी येथील कोविड केअर सेंटरही लवकरच बंद करणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं.

8 लाख नागरिकांचा दुसरा डोस बाकी

दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे 8 लाख नागरिकांचा अजूनही कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेमे बाकी आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी शहरात 70 खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून 70 वॉर्डांत लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात एक खासगी डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून या वॉर्डातील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मराठवाड्यातील कोरोना स्थिती

सोमवारी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे नोंदवली गेली.

औरंगाबाद- 10 जालना- 01 परभणी- 10 नांदेड- 03 हिंगोली- 00 बीड- 00 लातूर- 10 उस्मानाबाद- 01

इतर बातम्या-

Vastu rules for bedroom | वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झालाय? मग वास्तूचे हे नियम पाळा, आणि नात्यामधील प्रेम वाढवा!

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.