काहींना महापुरुषांच्या जाती काढण्याचे ठेके दिले आहेत, धुसफूस सुरुच, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा तोफ डागली. सध्याच्या राजकारणावरुन त्याचा रोख कुठे होता हे वेगळं सांगायला नको. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची विचारपूस केली आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला.

काहींना महापुरुषांच्या जाती काढण्याचे ठेके दिले आहेत, धुसफूस सुरुच, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 2:58 PM

दत्ता कानवटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 28 नोव्हेंबर 2023 : राज्यात काहींना महापुरुषांच्या जाती काढायचे ठेके दिले आहेत. त्यांना महापुरषांपेक्षा मोठे व्हायचे आहे असा शाब्दिक हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी आज चढवला. सध्या राज्यात मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातून विस्तव पण जात नाही. दोन्ही नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढविण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली होती. आजही त्यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

तुम्ही तर जातीयवादी

त्यांना महापुरुषांच्या जाती काढायचे ठेके दिल्याची घणाघाती टिका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. बीडमधील दंगलीबाबत त्यांनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला. त्यांना काही किंमत देण्याची गरज नसल्याचे टोला त्यांनी हाणला. राज्यात सर्व जातीचे लोक गुण्या गोविदांने राहत आहेत. पण यांना जाती जातीत भांडणं लावायची आहेत. त्यांच्या तुकडे पाडायचे आहेत. तुमच्या पोटात गटार गंगा आहे. तुम्ही जातीयवादी आहात असा हल्ला त्यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

तुम्ही राजद्रोह केला

राज्यात सगळ्या जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण यांना जातीत तुकडे पाडायचे आहे. गावात जायला कुणी रोखलेले नाही. तुम्ही महापुरुषांच्या जाती काढून राजद्रोह केला, असा हल्लाबोल त्यांनी केला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हवे, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रविकांत तुपकर यांची विचारपूस

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मनोज जरांगे पाटील यांनी फोन केला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ते शेतकऱ्यांसाठी लढत असल्याचे जरांगे म्हणाले. त्यांनी तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तुपकर यांनी पण जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे.

त्यांना धनाजी-संताजीसारखा मीच दिसतो

26 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या ओबसी मेळाव्यानिमित्त भुजबळांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले होते. भुजबळ हे जुनाट नेते झाल्याचा टोला त्यांनी लगावला. भुजबळांना धनाजी-संताजीसारखा मीच दिसत असल्याचा चिमटा त्यांनी काढला होता. भुजबळांच्या जोडण्याच्या सल्ल्याचा पण त्यांनी समाचार घेतला. मराठा समाजाच्या हक्काचा आरक्षणाचा फायदा आताापर्यंत लाटला आणि आता जोडण्याची भाषा करु नका. आता मराठा तुमचे ऐकणार नाहीत, असे म्हणणे त्यांनी मांडले होते.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.