वेळ संध्याकाळी पाच वाजता, सिल्लोडमध्ये खा. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा, व्यवस्था काय?
विरोधी पक्षाचे लोकं धसकटं पाहायला येऊ लागले. शेतात मालचं राहिला नाही.
औरंगाबाद : सिल्लोडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची आज संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सभेचं आयोजन केलंय. प्रचंड जाहीर सभा, असे शहरात बॅनर लावलेले आहेत. एक लाख लोकं येतील असा दावा केला जातोय. पाच एकर जागेत खुर्च्यांच नियोजन केलं आहे. दोन लाख स्वेअर फूट जागेत ही सभा होत आहे. रोड शोसुद्धा पाहण्यासारखा राहील, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
एकनाथ शिंदे आले होते. त्यापेक्षाही जास्त उत्सुकता तरुणांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सभेबाबत आहे. डॉ. श्रीकांत हे युवकांचे आयकॉन आहेत. हा मैदान पुरणार नाही. डॉ. श्रीकांत यांचे दोन शब्द ऐकण्यासाठी हे तरुण येणार आहेत. नुसता चेहरा पाहण्यासाठीही लोकं येतील, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
संध्याकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. याठिकाणी पाय ठेवायला जागा राहणार नाही, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सत्तार म्हणाले, आम्ही जे बोलतो ते करतो. जे करतो ते शेतकऱ्यांच्या अकाउंटपर्यंत टाकतो. यांच्यासारखे फोटो काढायला आम्ही बांधापर्यंत जात नाही.
गेल्या १९ दिवसांत हजारो शेतकऱ्यांशी संपर्क केला. प्रत्येक्ष तालुक्यांत बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चर्चा केली. चार महिन्यांत चौथी नुकसानभरपाई दिली. विरोधी पक्षाला याचा अभ्यास नसावा. विरोधी पक्षाचे लोकं धसकटं पाहायला येऊ लागले. शेतात मालचं राहिला नाही. मग, शेतात काय पाहियला येतात, असा टोला सत्तार यांनी विरोधकांना लावला.
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडं उरलेले १५ आमदार राहिले पाहिजे. उरलेले सहा खासदार राहिले तर खूप झाले. त्यासाठी त्यांचा हा सारा आटापिटा असल्याची टीका सत्तार यांनी केली.