Uddhav Thackeray Aurangabad Sabha LIVE : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात

| Updated on: Jun 08, 2022 | 10:12 PM

Uddhav Thackeray Aurangabad Sabha LIVE : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Live) यांच्या औरंगाबादमधील सभेची (Aurangabad Speech) चर्चा होती. अखेर आज तो दिवस उजाडला आहे. आज औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडत आहे.

Uddhav Thackeray Aurangabad Sabha LIVE : भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंचा घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ औरंगाबादेत धडाडलीImage Credit source: tv9

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Live) यांच्या औरंगाबादमधील सभेची (Aurangabad Speech) चर्चा होती. अखेर आज तो दिवस उजाडला आहे. आज औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार पडत आहे. या सभेचा सध्या राजभर बोलबाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेवर हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून टीका होत आहे. त्याला मुख्यमंत्री आज काय प्रत्युत्तर देणार? तसेच नामांतराच्या वादावरही काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गेल्या काही दिवसांपासून सतत शिवसेनेला टार्गेट केलं आहे. त्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आजची सभा ही रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा दावा शिवसेना नेते करत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jun 2022 09:06 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    आक्रोश करायचा असेल तर दिल्लीत जा

    पीकविमा कंपन्यांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे?

    योजना अशा आणायच्या की शेतकरी नागवायचा

    ज्या ज्या वेळेला अवकाळी येते, तेव्हा आम्ही तुमच्या बांधावर येतो

    तुम्ही भुलता, मग आम्ही सत्तेत येतो आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आम्ही विसरतो

    मला सांगा अच्छे दिन आले का ओ…

    निवडून आलं की पुन्हा धर्माचं राजकारण, कुठलीही तरी मशिद काढायची

    मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की देशातील प्रमुख पक्षांना, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि सांगा की कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आणि सांगायचं

    उज्ज्वला योजनेत गॅस सिंलिंडर मिळत नव्हता

    बोंबाबोंब सुरु झाली की पुन्हा ही योजना सुरु केली

    पेट्रोल-डिझेलबाबतही तसंच आधी किंमत वाढवायची आणि लोक ओरडायला लागले की थोडे कमी करायचे

  • 08 Jun 2022 09:04 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    इतकी वर्षे ज्यांनी तुम्हाला सांभाळलं जोपासलं

    मला आजही आठवतं एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते

    म्हणाले यावेळी आम्हाला महापौरपद द्या

    बाळासाहेबांनी एका क्षणात सांगितलं ठीक आहे तुमचा महापौर

    ते आकडेमोड करत बसले नाहीत

    तेव्हा हेच भागवत कराड महापौर झाले

    आज ते दिल्लीत गेले आहेत.

  • 08 Jun 2022 09:03 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    मुंबई ते नागपूर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण जालन्याला जोडतो आहोत

    परभणी आणि धारिशव वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली आहे

    संभाजीनगरमध्ये संत विद्यापीठ, पुरातन मंदिरांचं जनत, गड किल्ल्याचे जतन करतो आहोत

    असे विचार तुमच्या मनाला कधी शिवले तरी होते का?

    रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं

    पुन्हा येणार म्हणत होते

    त्यांना कळलंही नाही की या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत

    महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो

    त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली

    मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत

    एक जमाना होता जेव्हा शिवसेना आणि भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात अपृश्य होता

    कारण आपण हिंदुत्वावर लढत होतो

    कठीण काळात तुम्हाला शिवसेना लागली आणि आज केंद्रात सत्तेत आल्यानंतर तिच शिवसैना तुम्हाला वैरी भासू लागली

    मग काढा तुमचे मित्र पक्ष

    आधी किती आणि आता किती राहिले याचा आराखडा मांडा

  • 08 Jun 2022 09:01 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    पंतप्रधानांनी चांगलं सांगितलं की आपल्या देशात विरोधी पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्याच मुद्द्यावर बोलतोय

    बरोबर आहे, पण त्यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे

    भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतो, मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते

    आज काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे

    असाच एक सैनिक होता तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता

    त्याने अनेक अतिरेकी मारले होते

    तो सुट्टीवर निघाल्यानंतर त्याचं अपहरण झालं

    काही दिवसानंतर त्याचा छिन्नविछिन्न झाले मृतदेह सापडला

    त्याचं नाव होतं औरंगजेब

    तेव्हा तुम्ही तो आमचा नाही तो मुसलमान आहे असं म्हणणार आहात का?

  • 08 Jun 2022 08:46 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    भाजपनं मध्ये एक सभा घेतली होती, त्यात भगव्या टोप्या घालून आले होते

    टोपीत हिंदुत्व नसतं, मग संघ का काळ्या टोप्या घालतो

    तेव्हा मला विचारलं तुम्ही संघावर का टीका केली

    मी संघावर टीका केली नाही

    पण तुमच्या कार्ट्यांनी आज काय सुरु केलं ते पहा

    सरसंघचालकांनी आज जी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो

    प्रत्येक मशिदीखाली हिंदुत्व शोधायची गरज नाही, ते योग्यच आहे

    भोंगे वाजवणारे आणि कबरीवर जाणाऱ्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत – उद्धव ठाकरेंचा घणाघात

  • 08 Jun 2022 08:45 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही

    शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे

    बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं

    पण धर्माच्या नावाने आमच्या अंगावर कुणी आला तर सोलल्याशिवाय राहणार नाही

    भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केल्यानंतर अरब राष्ट्रांनी आपल्याला गुडघ्यावर आणलं

    देशानं काय केलं आहे, देशानं का माफी मागायची

    भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही

    तुम्ही तुमच्या भूमिकेनं जा पुढे

    आज मी तुम्हाला जाहीरपणे विचारतो

    ज्या भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का

    अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि आम्ही तुमच्या मागे फरफटत यावं हे होणार नाही

  • 08 Jun 2022 08:43 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    बाबरीच्या जागेवर मंदिर बांधायचं धाडस तुम्ही केलं नाही

    कोर्टातून आदेश आल्यानंतर तुम्ही जनतेसमोर झोळ्या पसरवल्या

    मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं

    आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे

    भाजपचे जे बेलगामपणे सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्यावर लगाम घालावा.

    तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर आमचाही संयम सुटेल

    तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल

    हा भगवा फडकवायला बरा म्हणून घेतलेला नाही

    हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा, हिंतुत्वाचा भगवा आहे

    इकडे हनुमान चालिसा बोलायची आणि तिकडे जाऊन शिव्या द्यायच्या हे बरोबर नाही

  • 08 Jun 2022 08:38 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरं सोडली आहेत

    घरात, शाळेत जाऊन गोळ्या घातल्या जात आहेत

    हिंमत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसा वाचा

    मर्द असाल तर पहिले काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा

    ही शिवसेना बाळासाहेबांची नाही म्हणे, मग कुणाची आहे

    उद्धव ठाकरे म्हणून मी शून्य आहे

    पण आज बाळासाहेबांमुळेच ही शिवसेना आहे आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे

    भाजपचा प्रवक्ता देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही

    भाजपच्या प्रवक्त्यामुळे आखाती देशांपुढे भारत गुडघ्यावर

  • 08 Jun 2022 08:37 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    रुपया खाली घसरतोय पण आम्हाला चिंता कोणती तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे

    आमचं हिंदुत्व मोजण्याची मोजपट्टी तुम्हाला कुणी दिली?

    चला होऊन जाऊ द्या

    शिवसेनेनं हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपनं काय केलं हे एकदा खुल्या मंचावर होऊन जाऊ द्या

    आता फडणवीस सांगत आहेत

    बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते

    मग मला सांगा संभाजीनगरचे मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते का

    नव्हते गेले तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजीव अतुल सावे यांनी सांगावं की मोरेश्वर सावे तिकडे गेले नव्हते

    कुणाला हिंदुत्व शिकवताय

    बाबरी पडल्यानंतर आडवाणी, अटलजी यांचं स्टेटमेंट आहे

    हा इतिहास काही वर्षांपूर्वीचा आहे

    तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली नसती, अमरनाथ यात्रेवर गंडांतर आलं, काश्मिरी पंडितांच्या मागे शिवसेनाप्रमुख उभे राहिले नसते

    तर दिल्लीच्या तख्तावर आज तुम्ही हिंदुत्वाच्या जोरावर बसले असता काय?

  • 08 Jun 2022 08:35 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    संभाजीनगर कधी करणार? हे त्यांनी सांगायचं का आपल्याला.

    माझ्या वडिलांनी शिवसेनाप्रमुखांनी वचन दिलं आहे, ते मी कधी विसरणार नाही

    पण विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे

    एक सुरुवात म्हणून विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे करा असा प्रस्ताव मी दिला आहे

    तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर या शहराचं नामांतर नाही तर छत्रपती संभाजीराजेंना आदर्श वाटेल असं शहर मी करणार

    नाव बदलून चालणार नाही, नावं दिलं आणि पाणी नसेल

    नाव दिलं आणि रस्ते नसतील तर संभाजीराजे म्हणतील चल तुला रायगडावरील टकमक टोक दाखवतो

    विमानतळाचं नाव संभाजीराजेंच्या नावाने द्या आम्ही तुमचा सत्कार करतो

  • 08 Jun 2022 08:30 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    मागचे पाच वर्षे तुम्हीच होता

    आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो

    खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही

    रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे

    तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते

    अजूनही पूर्ण काम झालेलं नाही, पण सुधारणा होत आहे

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला

    अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे

    मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल

    विध्वसंक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही

    संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही.

  • 08 Jun 2022 08:28 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    जुनी एक योजना आहे 1972 ची ती गंजून गेलीय, तिच्यासाठीही पैसे देतोय

    समांतर जलवाहिनीची भूमिपूजन मी केलं होतं

    दुर्दैवानं कोरोनामुळे एक वर्ष गेलं

    पण मी केंद्रकरांना सांगितलं आहे की हातात दंडा घ्या आणि आडवा येईल त्याला सरळ करा

    पण आता किंमती वाढल्या आहेत

    पण मी एक पैसा त्या योजनेला कमी पडू देणार नाही

    कंत्राटदार काम करत नसेल तर त्याला तुरुंगात टाकण्याचे आदेश मी दिले आहेत

    कालही वाईल्ड लाईफची एक बैठक घेतलीय

    जायकवाडीत विहिरीसाठी त्यांची परवानगी लागते.

  • 08 Jun 2022 08:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे

    हिंदुत्व हा आपला श्वास आहे

    पाणी प्रश्न असताना मी पाठ फिरवणार नाही

    औरंगाबादमधील पाणी प्रश्न लवकरच सोडवणार

    झारीतल्या शुक्राचार्याला घेऊन पाणी प्रश्न मिटवणार

    पाणी योजनेला एकही पैसा कमी पडून देणार नाही

    आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हता

    सत्ता गेली म्हणून आक्रोश होता

  • 08 Jun 2022 08:04 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : खासदार संजय राऊत यांचं भाषण Live

    व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर सगळेच शिवसेनेचे वाघ आहेत आणि वाघाचा बाप पाच मिनिटात येत आहे. मराठवाड्यात खूप वर्षानंतर असी विराट सभा होतेय. 37 वर्षापूर्वी जेव्हा इथं शाखा स्थापन झाली तेव्हा कुणाला वाटलंही नसेल की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि तेही मुख्यमंत्री म्हणून.

    काय ही गर्दी… असं वाटतं की समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटेचा तडाखा भाजपला बसला तर पाणी मागायलाही उठणार नाहीत. अशी प्रचंड लाट इथे उसळली आहे. ही लाट पाहून मी इतकंच सांगतो ही आंधी है तुफान है… कोई तोड नहीं है उद्धव ठाकरे का…

    ही लाट दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिल्याशिवाय राहणार नाही. हा महाराष्ट्र, हा मराठवाडा कुणाचा ही सांगणारी ही सभा आहे. काही लोक मधल्या काळात येऊन गेले. पण मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणाऱ्याची औलाद अजून जन्माला यायची आहे.

    हा मराठवाडा ज्याने औरंगजेबाला या मातीत गाडलं. हाच मराठवाडा ज्याने निजामाला पळवून लावलं… आणि हिच शिवसेना जी निजामाच्या बापाच्या छाताडावर पाय देऊन सत्तेत आली आहे. आता आम्हाला हटवणं तुम्हाला शक्य होणार नाही. ही गर्दी, ही शक्ती एवढंच सांगते आमच्या वाट्याला जाऊ नका, आमचा नाद करु नका…

  • 08 Jun 2022 08:00 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : उद्धव ठाकरे मंचावर दाखल

    सोबत तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित

  • 08 Jun 2022 07:58 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : औरंगादेतल्या सभेसाठी तगडं नियोजन

  • 08 Jun 2022 07:54 PM (IST)

    औरंगाबाद – मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

    – भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत जल आक्रोश मोर्चातील आजीबाईंनाही घेतले ताब्यात

    – औरंगाबादमधील छावणी पोलिस स्टेशनमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

  • 08 Jun 2022 07:40 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल

  • 08 Jun 2022 07:37 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : औरंगाबादेत शिवसेनेचं भगवं वादळ

    मुख्यमंत्री थोड्याच वेळात सभा स्थळाकडे जाण्यासाठी निघणार

    औरंगाबादेतून शिवसेना नेत्यांचा भाजपवर हल्लाबोल

  • 08 Jun 2022 07:26 PM (IST)

    cm uddhav thackeray : मुख्यमंत्र्यांचं औरंगाबादेत जंगी स्वागत

  • 08 Jun 2022 07:07 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : औरंगाबादेतली सभा याठिकाणी लाईव्ह पाहा

  • 08 Jun 2022 07:05 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : औरंगाबादेत शिवसेनेचं भगवं वादळ

  • 08 Jun 2022 07:05 PM (IST)

    cm uddhav thackeray Live : औरंगाबादेत शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन

    मुख्यमंत्र्यांचा ताफा हॉटेल परिसरात दाखल

    काही वेळातच मुख्यमंत्री बोलायला उभे राहणार

  • 08 Jun 2022 06:59 PM (IST)

    cm uddhav thackeray live : मुख्यमंत्री औरंगाबादेत दाखल

    उद्धव ठाकरे यांचा ताफा विमानतळावरून निघाला

  • 08 Jun 2022 06:23 PM (IST)

    मुख्यमंत्री काही वेळातच औरंगाबादेत दाखल होणार

    औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची विराट सभा

    मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जनसागर लोटला

    औरंगाबादेत शिवसैनिकांची तुफान गर्दी

  • 08 Jun 2022 05:56 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा मुंबई विमानतळावर पोहचला

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद जाहीर सभेसाठी मुंबईहून निघाले..

    औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्र्याची जाहीर सभेसाठी जय्यत तयारी पाहायला मिळतेय..

    औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्र्याची रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे असे शिवसैनिकांच्या दावा आहे..

    जाहीर सभेत मुख्यमंत्री काय बोलतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेली आहे.

  • 08 Jun 2022 05:24 PM (IST)

    cm uddhav thackeray live : मुख्यमंत्री रावाना होतानाची दृश्य

  • 08 Jun 2022 05:23 PM (IST)

    cm uddhav thackeray live : संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • 08 Jun 2022 05:22 PM (IST)

    cm uddhav thackeray live : सभेसाठी शिवसैनिक औरंगाबादेत जमले

  • 08 Jun 2022 05:19 PM (IST)

    cm uddhav thackeray live : औरंगाबादेतला राजकीय माहौल तापला

    औरंगाबाद – वेगवेगळ्या घोषणा असलेले फलक हातात घेऊन शिवसैनिक मैदानावर दाखल

    देव देश आणि धर्म हेच शिवसेनेचे मर्म

    आवाज कोणाचा शिवसेनेचा

    विकासासोबत संस्कृती जपणारे आपले सरकार ठाकरे सरकार असे

    बॅनर घेऊन शिवसैनिक मैदानात दाखल

  • 08 Jun 2022 05:17 PM (IST)

    cm uddhav thackeray live : मुख्यमंत्री औरंगाबादच्या सभेसाठी रवाना

    काही वेळातच मुख्यमंत्री औरंगाबादेत दाखल होणार

    सभेसाठी मैदानात लोक जमायला सुरूवात

    औरंगाबादेत शिवसेनेचं भगवं वादळ

Published On - Jun 08,2022 5:14 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.