‘यांना बापसुद्धा इतरांचा लागतो, स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल’, उद्धव ठाकरे यांचा खोचक घणाघात!

भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लात मारत आहेत. त्यांना खाली खेचायचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

'यांना बापसुद्धा इतरांचा लागतो, स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल', उद्धव ठाकरे यांचा खोचक घणाघात!
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:15 PM

संभाजीनगर : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपसह शिंदे यांचं नाव न घेता खोचक शब्दात निशाणा साधलाय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला कोण असतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. Uddआज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर मोदींनी यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

आज मित्रपक्ष कठीण काळात सोबत राहीले हे विसरु नका. तुम्ही माझं काय चोरणार. मला माझ्या जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या सभेला तुम्ही माणसं भाड्याने लागतात. सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेवर घणाघात केला.

नुस्ती सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता. आम्ही तुमच्यासोबत होतो. मी शिवेसनाप्रमुखांना काय वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन, असं वचन दिलं नव्हतं. हे मी अमित शाह यांना स्पष्ट सांगितलं होतं. आजसुद्धा तुम्ही शिवसेना फोडली. पण तरीही हृदयावर दगड ठेवून बसला आहात ना? मिंदेंचं ओझं डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशासाठी चालवला आहे? शिवसेना संपवण्यासाठी? पण ते तुम्हाला पेलवणार नसल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

ही आमची सभा. या सभेला वज्रमूठ असंच नाव दिलेलं नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला मोठं करण्याची वृत्ती दिली. मोठी करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, सोसलो, अगदी सावरकरांचे भक्त आले असते, ज्या सावरकरांनी 14 वर्ष भोगलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं. तेच स्वातंत्र्य धोक्यात आहे हे भाजपमधल्या सावरकर भक्तांना मान्य आहे का? आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे नाहीतर आपणच आपल्या देशात गुलाम होऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.