Uddhav Thackeray : ‘कुणीही सोम्या गोम्या म्हणत…,’ उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत सुनावलं!
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील सभेमध्ये भाजपवर टीका करत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनाही सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींच्याच एक वाक्याचा धागा पकडत त्यांच्यावरच निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
संभाजीनगर : शिंदे गट वेगळा झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये शाब्दिक खडाजंगी होत असलेली पाहायला मिळते. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमधील सभेमध्ये भाजपवर टीका करत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनाही सुनावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींच्याच एक वाक्याचा धागा पकडत निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा हे. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या गोम्या आमच्यावर काहीही म्हणायचं. मोदींना म्हटलं की ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भाजप आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलं जातंय. विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. सर्व विरोधी पक्षाचे भ्रष्ट नेते भाजपात. तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपव बोचरी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना आव्हान
अमित शाह म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवायची आहे. जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेल यांचा मोठा पुतळा बांधला आहे. वल्लभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही? हा प्रश्न आहे. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? घुसवा फौज पण निवडणुका आल्यानंतर काहीतरी करणार आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या असल्याचं ठाकरेंनी म्हणत शाहांवरही निशाणा साधला.
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. औरंगजेबाचं मी गेल्यावेळी उदाहरण दिलं होतं. तिथे सीमेवर दलमॅन होता त्याचं नाव औरंगजेब. तो सुट्टी घेऊन कुटुंबियांना भेटायला जात होता पण दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. तो औरंगजेब देशासाठी शहीद झाला. जो आपल्या घटनेवर प्रहार करेल त्याच्या चिथळ्या उडवल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलंय.