Aurangabad | वैजापूरचे ‘पुतणे’ अभय पाटील चिकटगावकर भाजपात शामील, डॉ. कराड, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश!
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्कटदाबी सहन होत नसल्याने आपण भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा अभय पाटील चिकटगावकर यांनी केली होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले.
औरंगाबादः वैजापूरमधील राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांचे पुत्र आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर (Abhay Patil Chikatgaonkar) यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. अभय पाटील यांनी मागील सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली होती. बुधवारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. औरंगाबादचे केद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत अभय पाटील यांना भाजपातील पक्षप्रवेश झाला. त्यामुळे वैजापूरच्या पुतण्यांच्या हाती भाजपचं कमळ आलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
अभय पाटील चिकटगावकर यांची फेसबुक पोस्ट-
वैजापूर आणि चिकटगावकर कुटुंबातील राजकारण
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाचा असा वैजापूर विधानसभा मतदार संघ. येथील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कै. कैलास पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील या थोरल्या आणि धाकट्या चिकटगावकर हे बंधू नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. त्यांनी एक-एक वेळ आमदारकीदेखील भूषवली. 2003 नंतर दोन्ही भावांमधील राजकीय महत्त्वाकांक्षा वाढत गेली. दोघांमधील वाद विकोपाला गेले आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडली गेली. यात धाकटे चिकटगावकर अपक्ष म्हणून उभे राहिले. मात्र थोरल्या चिकटगावकरांनी धाकट्या चिकटगावकरांऐवजी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब ठोंबरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. 2009 मध्ये दोघेही बंधू आमने-सामने होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोघांतील वाद विकोपाला गेले आणि भाऊसाहेब चिकटगावकर आमदार झाले. त्यानंतर दोन वर्षांनी कैलास पाटील चिकटगावकर यांचे निधन झाले.
2019 मध्ये काका-पुतण्यात बेबनाव
कैलास पाटील चिकटगावकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अभय पाटील राजकारणात सक्रीय झाले. 2019 मध्ये त्यांनी उमेदवारीसाठी अट्टहास केला. अखेर काककांनी पुतण्याला उमेदवारी दिली. मात्र यात अभय पाटील पराभूत झाले. तेव्हापासून काका-पुतण्यांतील वाद विकोपाला गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना पुतणे अभय पाटील गैरहजर राहू लागले. पक्षातील मुस्कटदाबी सहन होत नसल्याने आपण भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले.
इतर बातम्या-