मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण द्या, शेकडो कार्यकर्त्यांसह वंचितचे औरंगाबादेत आंदोलन
औरंगाबादेत मुस्लीम आरक्षणाला घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
औरंगाबाद : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणामुळे वातावरण आधीच तापलेले आहे. मराठा, ओबीसी समाज आक्रमक आहे. असे असताना औरंगाबादेत मुस्लीम आरक्षणाला (Muslim reservation) घेऊन मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज (30 ऑगस्ट) औरंगाबाद शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. (Vanchit Bahujan Aghadi protest in Aurangabad Maharashtra demanding 5 percentage reservation to Muslim community)
मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या
वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या या आंदोलनादरम्यान शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. तसेच विभागीय आयुक्तालयासमोर दोन तास आंदोलन करत विभागीय आयक्तांना या संदर्भात निवेदन दिले. लवकरात लवकर या मागणीवर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला.
मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचे गजानन महाराज मंदिरासमोर आंदोलन
दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोना रुग्ण कमी झाल्यामुळे मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. औरंगाबादेतही भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील गाजनन महाराज मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलक महिला मंदिराच्या गेटवरून आत घुसल्या होत्या. तर भाजपचे काही कार्यकर्ते मंदिराच्या गेटवर चढले होते. भाजप कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गेटवर चढून आरती केली. या आंदोलनामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर बातम्या :
लोकसभा निवडणुकीतील जायंट किलर, पत्रकार ते खासदार, कोण आहेत इम्तियाज जलील?
जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद !https://t.co/J58VWS0O43#EknathKhadse |#NCP |#BJP |#ED |#Politics
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
(Vanchit Bahujan Aghadi protest in Aurangabad Maharashtra demanding 5 percentage reservation to Muslim community)