शिवसेना खासदार भावना गवळींचा भाजप आमदार राजेंद्र पाटणींशी वाद, वाशिममध्ये खळबळ

वाशिममध्ये शिवसेना खासदार भावना गवळी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. (Rajendra Patani Bhavana Gavali)

शिवसेना खासदार भावना गवळींचा भाजप आमदार राजेंद्र पाटणींशी वाद, वाशिममध्ये खळबळ
राजेंद्र पाटणी, भावना गवळी
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 5:43 PM

वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. यानंतर वाशिममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र पाटणी यांनी भावना गवळींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वाशिममध्ये तणाव निर्माण झाला होता. (Washim Shivsena MP Bhavana Gavali and BJP MLA Rajenra Patani conflict at collector office)

खासदार-आमदारांच्या वादामुळे तणाव

शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांमध्ये झालेल्या वाद पोलीस कर्मचारी व इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानं मिटला. मात्र, या घटनेची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी खासदार भावना गवळी यांच्या विरोधात अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावेळी आमदार समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी भावना गवळींविरोधात घोषणाबाजी केली.

खासदार भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याने वाशीम शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील बाजरपेठ बंद करण्याच आवाहन कार्यकर्ते दुचाकी वाहनांवरुन फिरुन करत असल्याचं दिसून आलं.

राजेंद्र पाटणी काय म्हणाले?

आम्ही नियोजन मंडळ्याच्या सभागृहात प्रवेश केल्यावर खासदार भावना गवळींनी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांचा तोल सुटला, त्या असभ्य भाषेत माझ्याशी बोलल्या. त्यांच्यासोबत पन्नास लोकं होते. खासदारांचं संतुलन का गेले समजलं नाही. लोकप्रतिनिधींनी मतभेद असले तरी बोलायलची पद्धत असते. त्यांच म्हणनं आम्ही ऐकून घेतलं वाद घातला नाही. आज घडलेला प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सांगितला, असल्याचं भाजप आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले.

संबंधित बातम्या :

‘शाहीनबागेत झालं तेच आताही झालं, देशात जाणीवपूर्वक आणीबाणी निर्माण करायचा प्रयत्न होतोय का?’

Delhi Farmers Tractor Rally LIVE | केंद्रानं शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका सोडावी : शरद पवार

(Washim Shivsena MP Bhavana Gavali and BJP MLA Rajenra Patani conflict at collector office)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.