नांदेड: नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारीसह उसाचे पीक आडवे झाले आहे. तसेच फळबागा आणि भाजीपाला पिकांनाही जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि देगलूर तालुक्यात प्रचंड नुकसान झालंय. रब्बी हंगामातील गव्हू, ज्वारी आणि हरभरा वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने थेट आडवाच पडलाय. तर तोडणीला आलेल्या उसाच्या पिकालाही वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळवलय. टरबूजसारख्या फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही जबरदस्त नुकसान या अवकाळी पावसाने केलय. त्यामुळे बळीराजा प्रचंड हतबल झाला असून सरकारकडे मदतीची याचना केल्या जातेय. आज नुकसान झालेल्या भागाची महसूल तथा कृषी विभागाने पाहणी केलीय मात्र शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर पुढील चार दिवस किमान तापमानात हळू हळू दोन ते तीन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 जानेवारीप्रमाणेच 15 जानेवारी रोजी देखील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ही माहिती परभणी येथील वसंतराव नाइक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास कामाजी डाखोरे यांनी दिली.
वायव्य भारतात 16 ते 18 जानेवारी दरम्यान पश्चिमी चक्रावात येणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार आहे. तिकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इतर बातम्या-